Join us  

IPL 2023: रेव्ह पार्टीत सहभाग, ड्रग्स घेतल्याचा झाला होता आरोप, लिलावात अनसोल्ड, पण रिप्लेसमेंट म्हणून आला अन्...  

IPL 2023, Wyne Parnell: यंदा आरसीबीकडून खेळत असलेल्या पार्नेलवर रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाल्याचा तसेच आयपीएलदरम्यान, ड्रग्स घेतल्याचा आरोप झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 5:49 PM

Open in App

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेलिस असे धडाकेबाज फलंदाज संघात असतानाही रॉलय चॅलेंजर्स बंगळुला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात मुंबईवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या बंगळुरूला पुढच्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, काल लखनौ सुपरजायंट्सकडून बंगळुरूला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, कालच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई झाली. मात्र एका गोलंदाजाने भेदक मारा करत बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली होती. या गोलंदाजाचं नाव आहे वेन  पार्नेल. 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असलेल्या वेन पार्नेलच्या पूर्वेतिहासाबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. यंदा आरसीबीकडून खेळत असलेल्या पार्नेलवर रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाल्याचा तसेच आयपीएलदरम्यान, ड्रग्स घेतल्याचा आरोप झाला होता. दरम्यान, यावर्षीच्या लिलावामध्येही पार्नेलला कुणीही खरेदी केले नव्हते. मात्र रिप्लेसमेंट म्हणून तो आरसीबीच्या ताफ्यात दाखल झाला आहेत. तसेच तब्बल ९ वर्षांनंतर आयपीएलमध्ये सामना खेळला आहे. 

आरसीबीने वेन पार्नेलला रीस टोप्लीचा रिप्लेसमेंट म्हणून संघात सहभागी करून घेतले आहेत. काल पार्नेलने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध भेदक गोलंदाजी करताना ४ षटकांत ४१ धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. मात्र आरसीबीला सामना जिंकून देण्यात तो अपयशी ठरला होता. 

वेन पार्नेल २०११ मध्ये पहिल्यांदा आयपीएलच्या संघातून खेळला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला पुणे वॉरियर्सच्या संघात स्थान मिळाले होते. याच हंगामात वेन पार्नेल हा संघातील सहकारी खेळाडू राहुल शर्मा याच्यासोबत रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाला होता. तिथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर ड्र्स घेतल्याचा आरोप झाला होता. तसेच त्यांची टेस्टसुद्धा पॉझिट्विह आली होती. त्यानंतर आपण ज्या पार्टीमध्ये गेलो होते ती वाढदिवसाच पार्टी होती, असा दावा केला. तसेच आपल्याला रेव्ह पार्टीबाबत काही कल्पना नव्हती, असेही सांगितले. त्यानंतर २०१४ पासून वेन पार्नेल आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता. मात्र यावेळी रिप्लेसमेंट म्हणून त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सुमारे ९ वर्षांनंतर त्याचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे.

३३ वर्षीय पार्नेलने आयपीएल २०२३ च्या लिलावामध्ये आपली बेस प्राइस ७५ लाख एवढी ठेवली होती. मात्र कुठल्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी केले नाही. पार्नेलने वयाच्या २६ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र २०२१ मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पार्नेल आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळला आहे. त्यात त्याने २९ बळी टिपले आहेत.  

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरद. आफ्रिका
Open in App