IPL 2023 Auction: SRH IPL 2023 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२ कोटींची रक्कम आहे. केन विलियम्सन, निकोलस पूरन आदी स्टार खेळाडूंना रिलीज करून SRH ने आपल्या बटव्यातील रक्कम बरीच वाढवली आहे. त्यामुळे IPL 2023 साठी मजबूत संघ तयार करण्याचा सनरायझर्स हैदराबादचा प्रयत्न आहे. कोची येथे होणाऱ्या लिलावात संघ मालकिण काव्या मारन ( Kaviya Maran) ही दोन अष्टपैलू खेळाडूंसाठी पैसा ओतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
कोणाच्य बटव्यात किती रक्कम ( Purse Remaining)
- सनरायझर्स हैदराबाद - ४२.२५ कोटी
- पंजाब किंग्स - ३२.२ कोटी
- लखनौ सुपर जायंट्स -२३. ३५ कोटी
- मुंबई इंडियन्स - २०.५५ कोटी
- चेन्नई सुपर किंग्स - २०.४५ कोटी
- दिल्ली कॅपिटल्स - १९.४५ कोटी
- गुजरात टायटन्स - १९.२५ कोटी
- राजस्थान रॉयल्स - १३.२ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८.७५ कोटी
- कोलकाता नाईट रायडर्स - ७.०५ कोटी
या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. २ कोटी ही सर्वोच्च किंत आहे आणि त्यात १९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १.५ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये ११ खेळाडूंचा समावेश आहे. मनीष पांडे व मयांक अग्रवाल हे दोन भारतीय खेळाडू १ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार SRH लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स किंवा कॅमेरून ग्रीन यांच्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याच्या तयारीत आहेत. आयपीएल लिलावात संघाला स्टार अष्टपैलू खेळाडू हवा आहे. ग्रीन, स्टोक्स किंवा सॅम कुरन हे रडारवर असतील. पण, ते पूर्ण आयपीएल विंडो खेळण्यासाठी उपलब्ध असणार की नाही यावर अंतिम निर्णय होईल. SRH ला रोमारियो शेफर्डला पर्याय शोधायचा आहे.
- बेन स्टोक्स- १५७ सामने, ३००८ धावा, १०७ विकेट्स
- कॅमेरून ग्रीन - २१ सामने, २४५ धावा, ५ विकेट्स
- सॅम कुरन - १४५ सामने, १७३१ धावा, १४९ विकेट्स
- सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad )
- रिलीज केलेले खेळाडू - केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद
- पर्समध्ये शिल्लक रक्कम - ४२.२५ कोटी
- परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४
- कायम राखलेले खेळाडू - अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 Auction: BIG TARGET, Cameron Green & Ben Stokes on Sunrisers Hyderabad’s radar inform SRH Official
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.