IPL 2023 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. २३ डिसेंबरला सर्व फ्रँचायझी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) फ्रँचायझीला एक सल्ला दिला आहे. SRH संघ लिलावात नवीन कर्णधाराच्या शोधात असेल. कारण, त्यांनी लिलावापूर्वी कर्णधार केन विल्यमसन याला करारमुक्त केले. त्यामुळे लिलावात सनरायझर्स हैदराबादचा प्रयत्न कॅप्टन मटेरियल खेळाडू शोधण्यावर असेल. अशा परिस्थितीत पठाणने हैदराबादचा नवा कर्णधार बनू शकणाऱ्या खेळाडूचं नाव सुचवलं आहे.
काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे
या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे.
स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनमध्ये इरफान म्हणाला, ''हैदराबाद सनरायझर्सने लिलावात मयांक अग्रवालला विकत घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो. कारण संघाला सलामीवीराची नितांत गरज आहे आणि मयांक येथे SRH साठी योग्य पर्याय असू शकतो. मयांकला कर्णधारही बनवता येऊ शकते. मयांककडेही वेगवान धावा करण्याची क्षमता आहे आणि मला वाटते की हैदराबाद मयांककडे कर्णधार म्हणून पाहू शकतो.'' इरफान पठाणची पत्नी आहे अप्सरा!
- सनरायझर्स हैदराबाद संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२ कोटींची रक्कम आहे.
- रिलीज केलेले खेळाडू - केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद
- परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४
- कायम राखलेले खेळाडू - अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 Auction : former Indian all-rounder Irfan Pathan explains why Sunrisers Hyderabad will go for Mayank Agarwal at the IPL 2023 auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.