IPL 2023 Auction Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या मिनी ऑक्शनला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिली आहेत. ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. पण, या खेळाडूंमध्ये दोन अष्टपैलू खेळाडूंना अधिक डिमांड आहे आणि ६ फ्रँचायझी या दोन खेळाडूंसाठी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तयार आहेत. कदाचित या लिलावात २० कोटींचा खेळाडू मिळू शकतो.
SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव
आयपीएल २०२३ चे मिनी ऑक्शन २३ डिसेंबरला कोची येथे होणार आहे. या लिलावात बेन स्टोक्स व सॅम कुरन या दोन अष्टपैलू खेळाडूंना सर्वाधिक डिमांड असल्याचे वृत्त समोर येत आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार ८ पैकी ६ फ्रँचायझी या दोन खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
- बेन स्टोक्स, सॅम कुरन यांना सर्वाधिक डिमांड
- हैदराबाद, पंजाब, लखनौ, मुंबई, चेन्नई यांच्या लिस्टमध्ये या दोन खेळाडूंपैकी किमान एकाचे नाव
- राजस्थान, कोलकाता, गुजरात यांचीही इच्छा, परंतु त्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम नाहीत
कुरन आणि स्टोक्स यांच्यासाठी काही फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा ओततील यात शंका नाही. पण, काहींना तसे करणे परवडणारे नाही. त्यांनाही या दोन्ही खेळाडूंपैकी एक हवा आहे, परंतु खात्यात तेवढे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांची बाजू भक्कम आहे. अशात २० कोटीचा टप्पा ओलांडला जाऊ शकतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू...
- विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १७ कोटी ( २०१८-२०२१)
- लोकेश राहुल - लखौन सुपर जायंट्स - १७ कोटी ( २०२२)
- ख्रिस मॉरिस - राजस्थान रॉयल्स- १६.२५ कोटी ( २०२१)
- युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स - १६ कोटी ( २०१५)
- रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स - १६ कोटी ( २०२२)
- रिषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स - १६ कोटी ( २०२२)
- रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्स - १६ कोटी ( २०२२)
- पॅट कमिन्स - कोलकाता नाईट रायडर्स - १५.५ कोटी ( २०२०)
- इशान किशन - मुंबई इंडियन्स - १५.२५ कोटी ( २०२२)
- राशिद खान - गुजरात टायटन्स - १५ कोटी ( २०२२)
कोणाच्या बटव्यात किती रक्कम ( Purse Remaining) - सनरायझर्स हैदराबाद (४२.२५ कोटी), पंजाब किंग्स ( ३२.२ कोटी), लखनौ सुपर जायंट्स ( २३. ३५ कोटी), मुंबई इंडियन्स ( २०.५५ कोटी), चेन्नई सुपर किंग्स ( २०.४५ कोटी), दिल्ली कॅपिटल्स ( १९.४५ कोटी), गुजरात टायटन्स (१९.२५ कोटी), राजस्थान रॉयल्स (१३.२ कोटी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ८.७५ कोटी), कोलकाता नाईट रायडर्स ( ७.०५ कोटी)
- आयपीएल फ्रँचायझींनी आतापर्यंत ७४३.५ कोटी रुपये लिलावात खर्च केले आहेत
- २३ डिसेंबरला २०६.५ कोटी ८६ खेळाडूंसाठी खर्च होणे अपेक्षित आहेत
- यानंतर आयपीएल लिलावात खेळाडूंच्या पगारासाठी एकूण ९५० कोटी खर्च झालेले असतील
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"