Join us  

IPL Auction 2023 LIVE Updates: मुंबई इंडियन्सची 6व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल; 7 'स्टार विदेशी' खेळाडू असणार ताफ्यात

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 2:02 PM

Open in App

23 Dec, 22 07:37 PM

विश्वचषकातील हॅटट्रिकवीर गुजरातच्या ताफ्यात

आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटल, ज्याने ट्वेंटी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती, त्याला गुजरातने 4 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केले आहे. विश्वचषकादरम्यान त्याने प्रभावी गोलंदाजी करताना न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक देखील घेतली होती. 

23 Dec, 22 07:32 PM

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 7 'स्टार विदेशी' खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या संघात आगामी हंगामासाठी 7 स्टार विदेशी खेळाडू असणार आहेत. यामध्ये टीम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, डेवाल्ड ब्रेव्हिस, स्टब्स, डुआन जॅन्सन, झाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. 
 

23 Dec, 22 07:18 PM

उर्विल पटेलला गुजरात टायटन्सने त्याच्या 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. 

23 Dec, 22 07:15 PM

डोनोवन फरेराला राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीने 50 लाखामध्ये आपल्या ताफ्यात घेतले. 

23 Dec, 22 07:14 PM

हिमाचल प्रदेशचा खेळाडू मयंक डागरला सनरायझर्स हैदराबाद संघाने एक कोटी 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. या आधी तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता.

23 Dec, 22 07:05 PM

भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाला 50 लाख रुपयांना मुंबई इंडियन्सने खरेदी केले. 

23 Dec, 22 07:04 PM

भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला लखनौ सुपरजायंट्सच्या फ्रँचायझीने 50 लाखामध्ये खरेदी केले. 

23 Dec, 22 06:59 PM

मुंबईचा 'कॅमेरून ग्रीन' आता वानखेडेचं मैदान गाजवणार - डिव्हिलियर्स

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 17.50 कोटींना खरेदी केले. यावर बोलताना मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले आहे. ग्रीन मुंबई इंडियन्सकडून खेळताना वानखेडे स्टेडियम गाजवेल असा दावा डिव्हिलियर्सने केला आहे. 
 

23 Dec, 22 06:37 PM

रेली रोस्सो, ट्रेव्हिस हेड, रॅसी डेर डसन आणि ॲडम मिल्ने या खेळाडूंना खरेदीदार मिळालेले नाहीत. 

23 Dec, 22 06:02 PM

काइल जेमिसनला चेन्नई सुपर किंग्सने 1 कोटी रूपयांमध्ये खरेदी केली आहे. खरं तर त्याला 2021 मध्ये 15 कोटी रूपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.

 

 

 

23 Dec, 22 06:06 PM

कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यामुळे आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्सची ताकद वाढली आहे. 

23 Dec, 22 05:38 PM

कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यामुळे आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्सची ताकद वाढली आहे. 

23 Dec, 22 06:02 PM

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्सला लखनौ सुपर जायंट्सने 75 लाखांना खरेदी केले आहे. यापूर्वी सॅम्स मागील हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता.

23 Dec, 22 05:58 PM

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मनीष पांडेला 2 कोटी 60 लाखांमध्ये आपल्यासोबत जोडले आहे. या आधी तो लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.

23 Dec, 22 05:31 PM

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या एन जगदीशनला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने 90 लाखामध्ये खरेदी केले. 
 

23 Dec, 22 05:30 PM

मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने खरेदी केल्यानंतर कॅमेरून ग्रीनने म्हटले, "मुंबई इंडियन्स हे आयपीएलचे पॉवरहाऊस आहे, त्या संघात सामील होताना मला खूप आनंद आहे. मी तिथे जाण्यासाठी खूप आतुर आहे यासाठी मी स्वतःला थांबवू शकत नाही". 

23 Dec, 22 05:28 PM

हिमांशु शर्माला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने 20 लाख रूपयांमध्ये खरेदी केले. 

23 Dec, 22 05:25 PM

मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 5.50 कोटींमध्ये गळाला लावले. 

23 Dec, 22 05:24 PM

वैभव अरोराचे त्याच्या पूर्वीच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने 60 लाखाला खरेदी केले. 

23 Dec, 22 05:23 PM

शिवम मावीला 6 कोटी रूपयांमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने खरेदी केले. 

23 Dec, 22 05:19 PM

केएस भरत 1.20 कोटी रूपयांमध्ये सीएसकेच्या ताफ्यात सामील झाला आहे. 

23 Dec, 22 05:07 PM

अष्टपैलू विव्रांत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.6 कोटी रुपयांना खरेदी केले. विव्रांतची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. विव्रांत शर्मा जम्मू-काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेटचा हिस्सा राहिला आहे. 

23 Dec, 22 05:06 PM

अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सी यांना पहिल्या फेरीत एकही खरेदीदार मिळाला नाही.  

23 Dec, 22 04:50 PM

इंग्लंडचा गोलंदाज रिक टोपली याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1.90 कोटींना विकत घेतले आहे. 

23 Dec, 22 04:47 PM

"बेन स्टोक्सला CSK सोबत राहून आनंद होईल. कारण प्रत्येक खेळाडूला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचे आहे", स्टोक्सला सीएसकेने खरेदी केल्यानंतर ख्रिस गेलने ही प्रतिक्रिया दिली.  

23 Dec, 22 04:34 PM

भारतीय खेळाडू 'लाखात' तर विदेशी खेळाडूंवर कोट्यवधींचा वर्षाव

आतापर्यंत झालेल्या बोलीत विदेशी खेळाडूंवर सर्वाधिक पैसे खर्च करण्यात आले आहेत. 

भारतीय खेळाडू 

  • अजिंक्य रहाणे - 50 लाख
  • इशांत शर्मा - 50 लाख 
  • जयदेव उनाडकट - 50 लाख 
  • मयंक अग्रवाल - 8.25 कोटी
  • मयंक मार्कंडे - 50 लाख 

विदेशी खेळाडू  

  • केन विल्यमसन - 2 कोटी 
  • हॅरी ब्रुक - 13.25 कोटी
  • सॅम कुरन - 18.50 कोटी
  • कॅमेरून ग्रीन - 17.50 कोटी
  • बेन स्टोक्स - 16.25 कोटी 
  • जेसन होल्डर - 5.75 कोटी
  • निकोलस पूरन - 16 कोटी 
  • हेनरिक क्लासेन - 5.25 कोटी
  • आदिल राशिद - 2 कोटी 


 

23 Dec, 22 04:32 PM

मयंक मार्कंडेला सनरायझर्स हैदराबादने 50 लाखामध्ये खरेदी केले. 

23 Dec, 22 04:25 PM

इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिदला 2 कोटी रूपयांंमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने खरेदी केले. 

23 Dec, 22 04:24 PM

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांमध्ये खरेदी केले. 

23 Dec, 22 04:23 PM

 झाय रिचर्डसनला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.5 कोटींना विकत घेतले. 
 

23 Dec, 22 04:22 PM

इंग्लंडच्या फिल सॉल्टला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटीमध्ये खरेदी केले. 

23 Dec, 22 04:19 PM

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटींना विकत घेतले आहे. क्लासेनची मूळ किंमत 1 कोटी होती.

23 Dec, 22 04:12 PM

इंग्लिश खेळाडू मालामाल; 3 खेळाडूंवर उडवला 48 कोटींचा गल्ला

बेन स्टोक्सला सीएसकेने 16.25 कोटींमध्ये खरेदी केले तर सॅम कुरनला पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीने 18.50 कोटी रूपयांना केले खरेदी केले. याशिवाय हॅरी ब्रुकला हैदराबादच्या फ्रँचायझीने 13.25 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. एकूणच आयपीएल फ्रँचायझींना या तिघांसाठी 48 कोटी रूपये खर्च केले. 

23 Dec, 22 04:17 PM

वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस पूरनला लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने 16 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले आहे. 

23 Dec, 22 04:05 PM

राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरचा संघात समावेश केला आहे. होल्डरला राजस्थानने 5.75 कोटींना विकत घेतले.
 

23 Dec, 22 04:00 PM

बेन स्टोक्सला सीएसकेच्या फ्रँचायझीने खरेदी केल्यानंतर त्याने पिवळ्या रंग असलेली पोस्ट केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

23 Dec, 22 03:48 PM

इंग्लिश संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने 16.25 कोटींमध्ये खरेदी केले. 

23 Dec, 22 03:45 PM

कॅमेरून ग्रीन मुंबईच्या ताफ्यात

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 17.50 कोटींना खरेदी केले. 
 

23 Dec, 22 03:40 PM

झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाला पंजाब किंग्जने खरेदी केले आहे. पंजाबने सिकंदरला त्याची मूळ किंमत 50 लाख रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. 


 

23 Dec, 22 03:29 PM

सॅम कुरन आता पंजाबच्या ताफ्यात

सॅम कुरनला पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीने 18.50 कोटी रूपयांना केले खरेदी केले आहे. सॅम कुरन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 

23 Dec, 22 03:21 PM

बांगलादेशच्या कसोटी संघाचा कर्णधार शकिब अल हसनला पहिल्या फेरीत एकही खरेदीदार मिळाला नाही. शाकिबने त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये ठेवली आहे. 

23 Dec, 22 03:20 PM

जो रूट पहिल्या फेरीत राहिला अनसोल्ड

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला पहिल्या फेरीत एकही खरेदीदार सापडलेला नाही. पहिल्या फेरीत रूटला खरेदी करण्यात कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. 
 

23 Dec, 22 03:09 PM

पंजाब किंग्जच्या संघाचा माजी कर्णधार मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने 8.25 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले आहे. 

23 Dec, 22 03:07 PM

भारत आणि मुंबईचा फलंदाज अजिंक्य रहाणेने त्याची मूळ किंमत 50 लाख ठेवली आहे. रहाणेसाठी सीएसकेने पहिली चाल खेळली आणि आपल्या ताफ्यात घेतले. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रहाणेला त्याच्या मूळ किमतीत खरेदी केले. 

23 Dec, 22 03:03 PM

इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुकला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली. अखेर काव्या मारनने बाजी मारली आणि 13.25 कोटी रूपयांना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ब्रुकला खरेदी केले. खरं तर ब्रुकची मूळ किंमत 1.50 कोटी एवढी होती. 

23 Dec, 22 02:48 PM

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. विल्यमसनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. यापूर्वीच्या हंगामात विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. हैदराबादने त्याला लिलावापूर्वी रिलीज केले होते. 

23 Dec, 22 02:07 PM

IPLच्या मिनी लिलावासाठी मंच सज्ज

आयपीएलच्या मिनी लिलावाला थोड्याच वेळात सुरूवात होणार 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२सॅम कुरेनबेन स्टोक्स
Open in App