आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईटरायर्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या आधीच्या लढतीत खेळलेल्या संघामध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या डावात मैदानात दव पडण्याची शक्यता असल्याने बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकताच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघात एक बदल करण्यात आला असून, रिज टोप्लीच्या जागी डेव्हिड विली याला संघात स्थान देण्यात आले आहे.
तर कोलकाता नाईटरायडर्सनेही आपल्या संघात एक बदल केला असून, अनुकूल सिंहच्या जागी लेगस्पिनर सुयश शर्मा याला संघात स्थान दिले आहे. सुशय शर्माचा हा आयपीएळमधील पहिलाच सामना असेल. दरम्यान, सामन्याच्या उत्तरार्धात मैदानावर पडणारा दव निर्णायक ठरू शकतो, असे कोलकात्याचा कर्णधार नितीश राणा याने सांगितले.
या सामन्यासाठी दोन्ही संघांनी निवडलेले अंतिम ११ खेळाडू पुढीलप्रमाणे कोलकाता नाईटरायडर्स - मनदीप सिंग, रहमतुल्लाह गुरबाझ, नितीश राणा (कर्णधार), आर.के. सिंह, आंद्रे रसेल, एसएन ठाकूर, सुनील नारायण, सुयश शर्मा, टीम साऊथी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाझ अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, आकाश दीप, मोहम्मद सिराज, के. शर्मा.