आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दण्यक्यात सुरुवात झाली आहे. या हंगामातील सात सामने मंगळवारपर्यंत आटोपले आहेत. जसजसे सामने होत आहेत. तसतशी ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत रोमांचक होत चालली आहे. मंगळवारी दिल्ली आणि गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमधील अव्वल स्थानावर काहीही बदल झालेला नाही. मात्र टॉप ५ मधील खेळाडूंच्या यादीत थोडे बदल झाले आहेत. गुजरातसाठी अर्धशतकी खेळी करणाऱ्या साई सुदर्शनची अव्वल ५ खेळाडूंमध्ये एंट्री झाली आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये रशिद खानने मार्क उडची चिंता वाढवली आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये सध्या चेन्नई सुपरकिंग्सचा ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे. त्याने दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण १४९ धावा आहेत. तर लखनौ सुपरजायंट्सचा कायल मायर्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने त्याने सुद्धा दोन अर्धशतकांसह १२६ धावा फटकावल्या आहेत. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर आणि साई सुदर्शन यांनी टॉप ५ फलंदाजांमध्ये प्रवेश करताना विराट कोहलीला या यादीमधून बाहेर केले आहे. तर तिलक वर्मा हा अजूनही पाचव्या क्रमांकावर आहे.
तर पर्पल कॅपच्या शर्यतीत दोन सामन्यात मिळून ८ बळी घेणारा लखनौ सुपरजायंट्सचा मार्क वुड आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा रशिद खान आहे. त्याने दोन सामन्यात ५ बळी टिपले आहेत. तर लखनौचा रवी बिश्नोई ५ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑरेंज कॅप (पहिले पाच फलंदाज)
१ - ऋतुराज गायकवाड १४९ धावा (२ सामने)
२ - काइल मायर्स १२६ धावा (२ सामने)
३ - डेव्हिड वॉर्नर ९३ धावा (२ सामने)
४ - साई सुदर्शन ८४ धावा (२ सामने)
५ - तिलक वर्मा ८४ धावा (एक सामना)
पर्पल कॅप (पहिले ५ गोलंदाज)
१ - मार्क वुड ८ बळी (२ सामने)
२ - रशिद खान ५ बळी (२ सामने)
३ - रवी बिश्नोई ५ बळी (२ सामने)
४ - मोहम्मद शमी ५ बळी (२ सामने)
५ युझवेंद्र चहल ४ बळी (१ सामना)
Web Title: IPL 2023: Battle for Orange and Purple Caps in IPL, Who Leads Right Now? This is the list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.