Join us  

ब्रेक्रिंग न्यूज! IPLमध्ये पाकिस्तान नंतर आता 'या' देशांच्या क्रिकेटर्सवर लागणार बंदी!

जाणून घ्या काय आहे इतक्या मोठ्या निर्णयाचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:24 PM

Open in App

IPL 2023 31 मार्चपासून सुरू होत आहे. या आयपीएलमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. BCCI IPL 2024 पूर्वी दोन देशांच्या खेळाडूंवर मोठी कारवाई करू शकते. या खेळाडूंना पुढील हंगामात खेळण्यासही बंदी घातली जाऊ शकते.

या देशांतील खेळाडूंवर होणार बंदी!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय पुढील हंगामापूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालू शकते. वास्तविक, बांगलादेश आणि श्रीलंका संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये उशिरा त्यांच्या संघात सामील होतील. बीसीसीआय या निर्णयावर नाराज असून या देशांच्या खेळाडूंवर मोठी कारवाई करण्याचा विचार करत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिलेले नाही. त्यामुळेच शाकिब अल हसन, लिटन दास आणि मुशफिकर रहीम यांना ९ एप्रिल ते ५ मे आणि त्यानंतर १५ मेपर्यंत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या खेळाडूंबद्दल बोलायचे तर ते पहिल्या आठवड्यानंतर आपापल्या संघात सामील होतील.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले मोठे अपडेट

BCCI च्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, "विशिष्ट देशांतील खेळाडू या स्पर्धेत अर्धवेळ खेळण्यासाठी आले असल्यास फ्रँचायझींना त्यांच्या निवडीबद्दल शंका असेल. केवळ बीसीसीआयच नाही तर आयपीएल फ्रँचायझीही आपले खेळाडू उपलब्ध नसल्याने नाराज आहेत.

दरम्यान, IPL 2023 सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. आगामी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी देशभरातील 12 स्टेडियममध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. लीग टप्प्यातील शेवटचा सामना २१ मे रोजी तर अंतिम सामना २८ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

टॅग्स :आयपीएल २०२३पाकिस्तानश्रीलंकाबांगलादेश
Open in App