Join us  

IPL 2023: ब्रुकचं झंझावाती शतक, ईडन गार्डनवर षटकार-चौकारांचा पाऊस, KKR विरुद्ध हैदराबादचा धावांचा डोंगर

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates : आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायर्डविरुद्ध धावांचा डोंगर उभारला आहे. हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावा कुटून काढल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 9:29 PM

Open in App

आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायर्डविरुद्ध धावांचा डोंगर उभारला आहे. कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर हॅरी ब्रुकचे तुफानी शतक, कर्णधार मार्क्रमची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि अभिषेक शर्मा आणि क्लासेन यांनी शेवटच्या षटकांमध्ये केलेली तुफानी फटकेबाजी याच्या जोरावर हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावा कुटून काढल्या. यंदाच्या हंगामात कुठल्याही संघाने रसलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. आता विजयासाठी कोलकाता नाईटरायडर्ससमोर २२९ धावांचे आव्हान असेल.

 केकेआरने फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर पहिल्या षटकापासूनच हॅरी ब्रुक हा केकेआरच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३२ चेंडूतच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान, मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी झटपट बाद झाले. मात्र ब्रुकने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. 

त्यानंतर ब्रुकने मार्क्रमसोबत ६२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान मार्क्रमनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर मार्क्रम ५० धावा काढून बाद झाला. त्यानंतर ब्रुक आणि अभिषेक शर्माने ७२ धावांची भागीदारी करत संघाला दोनशेपार नेले. अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३२ धावा कुटल्या.

अखेर शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत ब्रुकने आपलं शतक पूर्ण केलं. ब्रुकने ५५ चेंडूत शंभरीपार मजल मारली. ब्रुकची साथ देण्यास आलेल्या क्लासेनने ६ चेंडूत १६ धावा फटकावत हैदराबादला निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद २२८ धावांपर्यंत मजल मारून दिली, कोलकात्याकडून रसेलने ३ बळी टिपले. तर वरुण चक्रवर्तीला एक विकेट मिळाली. 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स
Open in App