IPL 2023, Virat vs Gambhir fight Marathi : गौतम गंभीर आणि विराट कोहली हे दोन आक्रमक अन् विशेषतः दिल्लीचे खेळाडू यापूर्वीही आयपीएलमध्ये एकमेकांसोबत भांडले होते. KKRचा माजी कर्णधार ज्याने दोन आयपीएल स्पर्धा जिंकल्या, तेव्हाही विराट त्याच्याशी एका सामन्यात भांडला होता. आज लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर असलेल्या गंभीरसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी कर्णधार विराटची हुज्जत झाली. आयपीएल २०२३ मध्ये LSG ने पहिल्या टप्प्यात RCBला त्यांच्याच घरच्या मैदानावर थरारक सामन्यात नमवले होते. त्यामुळे आज लखनौ येथे दाखल झालेला RCBचा संघ वचपा काढण्याच्या तयारीनेच आला होता. नशीबानेही त्यांना साथ दिली अन् लोकेश राहुल दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला.
विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात राडा, LSGचा खेळाडू अंगावर धावला
RCBच्या ९ बाद १२६ धावांचा पाठलाग करताना LSGचा संपूर्ण संघ १०८ धावांत तंबूत परतला. विराट ( ३१) आणि फॅफ ( ४४) यांनी ६१ धावांची भागीदारी केली, पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. कृणाल पांड्याने ( ४-०-२१-०), रवी बिश्नोईने ( ४-०-२१-२) व अमित मिश्राने ( ३-०-२१-२) अशी स्पेल टाकली. नवीन उल हकने ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, लखनौच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आयुष बदोनीने पुन्हा संधी गमावली, कायले मायर्स पहिल्याच षटकात माघारी परतला. दीपक हुडा अपयशी ठरला. कृणाल पांड्या, निकोलस पूरन व मार्कस स्टॉयनिस यांनी थोडा संघर्ष दाखवला. पण, अखेर लखनौचा पराभव झाला. ८ चेंडूंत २४ धावांची गरज असताना राहुल फलंदाजीला आला. मात्र, त्याला उशीर झाला.
सामन्यानंतर नेमकं काय घडलं?
- कायले मायर्स विराटसोबत गप्पा मारताना गंभीर तेथे आला अन् LSGच्या फलंदाजाला घेऊन गेला.
- त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असताना वादाची पहिली ठिणगी पडली
- LSGचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले
- विराटने तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले अन् हे पाहून नवीन अंगावर धावला, परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले
- हा वाद पाहताच गौतम गंभीर पुन्हा आक्रमक पवित्र्यात गेला अन् दूरूनच विराटवर खवळला
- लोकेश राहुलसह लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विराटपर्यंत पोहोचला
- त्यानंतरही विराट शांततेने त्याच्याशी बोलताना दिसला, परंतु गंभीरचा पारा चढाच होता.
- पण खरं भांडण जेव्हा नवीन बाद होऊन माघारी जात होता तेव्हाच सुरू झालं होतं.. विराट त्याला काहीतरी म्हणाला होता.
Web Title: IPL 2023 Controversy, LSG vs RCB Live Marathi : Watch Full Video of Virat Kohli vs Naveen ul haq and Gautam Gambhir fight
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.