Suresh Raina IPL 2023 : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात लॉर्ड्सवर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व सुरेश रैना यांना एकत्रित पाहून चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) चाहते सुखावले. इंडियन प्रीमिअर लीग २०२० ( IPL 2020) नंतर या दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा होती आणि आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्ये CSKने पर्समध्ये पैसे असूनही रैनाला करारबद्ध केले नाही. त्यामुळे Mr. IPL रैनाला आयपीएल २०२२मध्ये खेळता आले नाही. पण, लॉर्ड्सवर हे दोन मित्र पुन्हा एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा 'Thala' व 'Chinna Thala' सोबत दिसतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामागे रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja) नाराजी हेही एक कारण आहेच. १६ कोटी देऊन CSK ने जडेजाला मागच्या पर्वात संघात कायम राखले होते आणि त्यानंतर कर्णधारपदही दिलं होतं. पण, अचानक कर्णधारपद काढून घेतल्यानंतर जडेजा नाराज असल्याची चर्चा आहे.
सुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२० पासून
चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) आणि सुरेश रैना यांच्यात बिनसलेल्या संबंधाचे सारेच साक्षीदार आहोत. त्यात धोनी व रैना यांच्यातही खटके उड्याल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, आज या दोघांना सोबत पाहून त्या चर्चांना पूर्णविराम नक्की लागला आणि नवीन चर्चा सुरू झालीय...
रवींद्र जडेजाने काही दिवसांपूर्वी CSK संबंधित सर्व पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केल्या होत्या. आयपीएल २०२२मध्ये ज्या प्रकारे जडेजाकडून नेतृत्व काढून घेतले गेले. त्याने तो निराश होता आणि त्यानंतर त्याने दुखापतीमुळे आयपीएलचे काही सामने खेळलेही नव्हते. जडेजाने आयपीएलमध्ये २१० सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत. CSK कडून सर्व काही ओके असल्याचे जरी सांगितले जात असले तरी आयपीएल २०२३मध्ये जडेजा CSK कडून खेळेल, याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रैनाशी जवळीक साधली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
पण, सोशल मीडियावरील या चर्चांना किती महत्त्व आहे, हे येणारा काळच सांगू शकेल. CSK ची स्ट्रॅटेजी पाहताना ते खेळाडूचं वय पाहत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे सुरेश रैना पुन्हा येलो जर्सीत दिसू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. पण, त्यासाठी त्यांना जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू गमवावा लागेल, हाही धक्का त्यांना पचवावा लागेल. आयपीएल २०२३साठी एक मिनी ऑक्शन होईल आणि तेव्हाच हे चित्र स्पष्ट होईल.
Web Title: IPL 2023 CSK Reunion: 'Thala' MS Dhoni FINALLY meets 'Chinna Thala' Suresh Raina during IND vs ENG 2nd ODI, it will be replacement of Ravindra Jadeja?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.