IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये प्ले ऑफच्या दिशेने मोठी झेप घेतली. दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून Point Table वर त्यांनी १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. DC चे मात्र Play Offs मधील आव्हान संपुष्टात आले. ११ सामन्यांत ७ पराभवांमुळे त्यांना तळावरच राहावे लागले. इम्पॅक्ट खेळाडू मथिषा पथिराणाने डेथ ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट घेत सामना फिरवला. दीपक चहरने सुरूवातीलाच दोन मोठे धक्के दिले होतेच. दिल्लीला आता शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित ३ सामने जिंकावे तर लागतीलच, शिवाय अन्य संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.
दिल्लीची सुरूवातही काही खास झाली नाही. दुसऱ्याच चेंडूवर दीपक चहरने DCचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला ( ०) झेलबाद केले. फिल सॉल्ट ( १७) चांगली फटकेबाजी करत होता आणि तिसऱ्या षटकात चहरने हाही काटा काढला. मनीष पांडे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला, परंतु त्याच्या चुकीच्या कॉलवर मिचेल मार्श रन आऊट झाला. दिल्लीला २५ धावांत तिसरा धक्का बसला आणि पॉवर प्लेमध्ये त्यांना ४८ धावा करता आल्या. पांडे व रिली रोसोवू यांनी चांगली खेळी करून दिल्लीचा डाव सावरला आणि ५१ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली.
फिरकीला पोषक खेळपट्टीवर धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फिरकीपटू मिचेल सँटनरला आणेल असा अंदाज होता. पण, धोनीने मथिषा पथिराणाला बोलावले अन् त्याने त्याच्या पहिल्याच षटकात कमाल केली. २७ धावांची खेळी करून रोसोवूसह ५९ धावांची भागीदारी करणाऱ्या पांडेला त्याने पायचीत केले. दिल्लीला ३६ चेंडूंत ८० धावा करायच्या होत्या आणि रवींद्र जडेजाने DCचा सेट फलंदाज रोसोवूला ( ३५) झेलबाद केले. अक्षर पटेलने चांगली लढत दिली, परंतु धावा अन् चेंडू यांच्यातली वाढलेली दरी कमी करण्याच्या प्रयत्नात तो २१ धावांवर बाद झाला. इथे दिल्लीच्या हातून मॅच पूर्णपणे गेली. १२ चेंडूंत ४८ धावा दिल्लीला करायच्या होत्या. ललित यादवने २०व्या षटकात सलग तीन चौकार मारून १२ धावांवर बाद झाला. दिल्लीला ८ बाद १४० धावा करता आल्या. चेन्नईने २७ धावांनी सामना जिंकला. पथिराणाने तीन विकेट्स घेतल्या.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'!
रवींद्र जडेजाने Six मारताच 'मिस्ट्री गर्ल' खूश झाली, कॅमेराची नजर तिच्याकडेच वळली, Video
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ( २४) , डेव्हॉन कॉनवे ( १०), अजिंक्य रहाणे ( २१), शिवम दुबे ( २५ ) आणि अंबाती रायुडू ( २३) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. त्यांनी आज CSKसाठी सर्वोत्तम ३८ धावांची भागीदारीची नोंद केली. धोनीने १९व्या षटकात खलिल अहमदला ६,४,२,६ असे चोपले. २०व्या षटकात जडेजा ( २१) झेलबाद झाला. मार्शने त्याच षटकात ९ चेंडूंत २० धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. चेन्नईने ८ बाद १६७ धावा केल्या.
Web Title: IPL 2023, CSK vs DC Live Marathi : Delhi Capitals out of the Play Off race? 'Super' win for Chennai super kings the are in 2nd in Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.