IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कालच्या सामन्यात रोहित शर्माच्या विकेटवरून गोंधळ सुरू असताना आजही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या लढतीत डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) बाद असूनही नाबाद राहिला अन् DCचा मार्गदर्शक सौरव गांगुली डग आऊटमध्ये बसून आश्चर्य व्यक्त करताना दिसला.
१३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या CSKला आज विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने मोठी झेप घेण्याची संधी आहे. दुसरीकडे DC ८ गुणांसह अजूनही शेवटच्या क्रमांकावर आहे आणि उर्वरित ४ सामने जिंकून त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पथिराणाच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये अंबाती रायुडूला संधी मिळाली आहे.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
रोहित शर्माच्या विकेटने एवढा 'राडा' झाला की ब्रॉडकास्टरला द्यावे लागले स्पष्टिकरण
मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; RCB प्ले ऑफच्या शर्यतीतून झाले का बाद?
IPL 2023 अंतिम टप्प्यात असताना गुजरात टायटन्सचा 'मोठा' निर्णय
ऋतुराज गायकवाड व कॉनवे या जोडीने आणखी एक आयपीएलचे पर्व गाजवले. दोघांच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल 2023 गाजवली आहे. आजची त्यांच्याकडून सरारात्मक सुरुवात झालेली दिसतेय. तिसऱ्या षटकात कॉनवेची विकेट पडता पडता राहिली. खलिल अहमदच्या चेंडूवर कॉनवेचा फटका मारण्याचा प्रयत्न चुकला. खलिलने झेलबाद होण्याची जोरदार अपील केले, परंतु यष्टिरक्षक फिल सॉल्ट ने त्याला काहीच ऐकू न आल्याचे सांगितले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर DRS घेऊ की नको हे विचारण्यासाठी पुढे आला, पण सॉल्टच्या रिअॅक्शनमुळे तो थांबला. मात्र, रिप्लेमध्ये DRS घेतला असता तर बरं झालं असतं असे DCला वाटले. चेंडू बॅटीला हलका चाटून गेल्याचे स्पाईकमध्ये दिसले. डग आऊटमध्ये बसलेला दादाही नाराज झाला.