IPL 2023, CSK vs DC Live : चेपॉक दिल्लीच्या गोलंदाजांनी गाजवले, MS Dhoni-जडेजा जोडीने CSKला वाचवले

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने आज चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 09:10 PM2023-05-10T21:10:58+5:302023-05-10T21:25:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs DC Live Marathi : MS DHONI THE GOAT FINISHER! 0,0,1,1,6,4,2,6,W - 20 runs in 9 balls, CSK to 167 from 20 overs. | IPL 2023, CSK vs DC Live : चेपॉक दिल्लीच्या गोलंदाजांनी गाजवले, MS Dhoni-जडेजा जोडीने CSKला वाचवले

IPL 2023, CSK vs DC Live : चेपॉक दिल्लीच्या गोलंदाजांनी गाजवले, MS Dhoni-जडेजा जोडीने CSKला वाचवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने आज चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफूटवर फेकले. फिरकीपटू अक्षर पटेल ( २-२७), कुलदीप यादव व ललित यादव यांनी CSKची आघाडीची फळी तंबूत पाठवून DCला मोठे यश मिळवून दिले. दिल्लीच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी करताना चेन्नईच्या धावगतीला वेसण घातले होते, परंतु महेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजा या जोडीने सर्व गणित बिघडवले. 

ऋतुराज गायकवाड ( २४)  व डेव्हॉन कॉनवे ( १०) यांना आज ३२ धावांचीच सलामी देता आली. अक्षर पटेल ७ चेंडूंत CSKच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कुलदीप यादवने मोईन अलीची ( ७) विकेट मिळवून दिली. ललित यादवला त्यानंतर गोलंदाजीला आणले अन् त्याच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा अजिंक्य रहाणेचा प्रयत्न चुकला. अजिंक्यने ( २१) वेगाने मारलेला चेंडू ललितने डाईव्ह मारून एका हाताने टिपला. अम्पायरलाही या झेलवर विश्वास बसेनासा झाला. 


पहिल्या विकेटनंतर CSKच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. शिवम दुबे व २०० वा आयपीएल सामना खेळणाऱ्या अंबाती रायुडूने १९ चेंडूत ३६ धावा जोडल्या अन् CSKला आशेचा किरण दाखवला.  अजिंक्यला बाद करणाऱ्या ललितच्या पुढच्या षटकात शिवम ( ६,६,४,१) व अंबाती ( ६) यांनी २३ धावा चोपल्या. DCसाठी दुबे डोकेदुखी ठरला होता आणि त्याला रोखण्यासाठी मिचेल मार्शला आणले. मार्शने आखूड टप्प्यावर दुबेला ( २५ ) फटका मारण्यास भाग पाडून झेलबाद केले. दुबेने आज आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला. खलिलने १७व्या षटकात अंबातीला ( २३) माघारी पाठवले.

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा घोळ! डेव्हॉन कॉनवे बाद असूनही नाबाद राहिला, सौरव गांगुलीलाही वाटले आश्चर्य 

अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'! 

ललित यादवचा 'क्रेझी' कॅच; अजिंक्य रहाणे बाद, अम्पायर आश्चर्यचकित, Video


अंबातीची विकेट पडल्यानंतर चेपॉकवर जल्लोष सुरू झाला, कारण फलंदाजीला महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला होता. अखेरच्या तीन षटकांत धोनी व रवींद्र जडेजा या जोडीने चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी आजच्या सामन्यातील CSKसाठी सर्वोत्तम ३८ धावांची भागीदारीची नोंद केली. धोनीने १९व्या षटकात खलिल अहमदला ६,४,२,६ असे चोपले. २०व्या षटकात जडेजा ( २१) झेलबाद झाला. मार्शने त्याच षटकात ९ चेंडूंत २० धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. चेन्नईने ८ बाद १६७ धावा केल्या. 

 

Web Title: IPL 2023, CSK vs DC Live Marathi : MS DHONI THE GOAT FINISHER! 0,0,1,1,6,4,2,6,W - 20 runs in 9 balls, CSK to 167 from 20 overs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.