Join us  

IPL 2023, CSK vs DC Live : रवींद्र जडेजाने Six मारताच 'मिस्ट्री गर्ल' खूश झाली, कॅमेराची नजर तिच्याकडेच वळली, Video 

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंनी आज चांगली गोलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 9:50 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंनी आज चांगली गोलंदाजी केली. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करण्यापासून त्यांनी रोखले. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी जोडलेल्या ३८ धावा या सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. CSKच्या अनुभवी फलंदाजांनी अखेरच्या षटकांत चांगला मारा केला अन् ते पाहून चेपॉकवर चाहते खूपच आनंदी झाले. असाच एक षटकार रवींद्र जडेजाने खेचला अन् कॅमेरामनचा कॅमेरा जल्लोष करणाऱ्या मिस्ट्री गर्लकडे वळला...  

ऋतुराज गायकवाड ( २४)  व डेव्हॉन कॉनवे ( १०) यांना आज ३२ धावांचीच सलामी देता आली. अजिंक्य रहाणे ( २१), शिवम दुबे  ( २५ )  आणि अंबाती रायुडू ( २३) यांनी छोटेखानी खेळी केली. अंबातीची विकेट पडल्यानंतर चेपॉकवर जल्लोष सुरू झाला, कारण फलंदाजीला महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला होता.

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा घोळ! डेव्हॉन कॉनवे बाद असूनही नाबाद राहिला, सौरव गांगुलीलाही वाटले आश्चर्य 

अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'! 

ललित यादवचा 'क्रेझी' कॅच; अजिंक्य रहाणे बाद, अम्पायर आश्चर्यचकित, Video

अखेरच्या तीन षटकांत धोनी व रवींद्र जडेजा या जोडीने चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी आजच्या सामन्यातील CSKसाठी सर्वोत्तम ३८ धावांची भागीदारीची नोंद केली. धोनीने १९व्या षटकात खलिल अहमदला ६,४,२,६ असे चोपले. २०व्या षटकात जडेजा ( २१) झेलबाद झाला. मार्शने त्याच षटकात ९ चेंडूंत २० धावा करणाऱ्या धोनीला बाद केले.   चेन्नईने ८ बाद १६७ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सरवींद्र जडेजा
Open in App