IPL 2023, CSK vs DC Live : अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'! 

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खराब अम्पायरींग पाहायला मिळतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 08:31 PM2023-05-10T20:31:50+5:302023-05-10T20:39:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs DC Live Marathi : Umpire saying - “There are little spikes when the ball is next to bat and the umpire deems it not out”, Yusuf pathan - “umpire shayad apna chashma bhul gye”  | IPL 2023, CSK vs DC Live : अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'! 

IPL 2023, CSK vs DC Live : अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खराब अम्पायरींग पाहायला मिळतेय... आयपीएलमध्ये अम्पायरचे वादग्रस्त निर्णय काही नवीन नाही आणि त्यामुळेच यंदाच्या पर्वात Wide-NoBall साठीही DRS घेण्याची मुभा संघांना देण्यात आली. तिसरा पंच मैदानावरील अम्पायर्सची चूक सुधारण्यासाठीच आहेच. पण, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( CSK vs DC) सामन्यात तिसराच अम्पायर चुकलेला पाहायला मिळाला अन् त्यावरून युसूफ पठाण भडकला. 

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पथिराणाच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये अंबाती रायुडूला संधी मिळाली आहे. ऋतुराज गायकवाड व कॉनवे या जोडीने आणखी एक आयपीएलचे पर्व गाजवले. पण, आज ही जोडी फार कमाल करू शकली नाही. डेव्हॉन कॉनवेला नशीबाने साथ दिली, पपरंतु पाचव्या षटकात अक्षर पटेलने त्याला पायचीत पकडले. ३२ धावांवर CSKची पहिली विकेट पडली, कॉनवे १० धावांवर बाद झाला. पण, त्यानंतर आलेल्या अजिंक्यने त्याच षटकात दोन खणखणीत चौकार खेचून दडपण हलके केले. पॉवर प्लेनंतर ऋतुराजने त्याची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला अन् अक्षरच्या चेंडूवर खणखणीत फटका खेचला, परंतु अमन खानने झेल टिपला. ऋतुराज १८ चेंडूंत २४ धावा करून माघारी परतला. अक्षरने मागील ७ चेंडूंत दोन विकेट्स घेत CSKला मोठे धक्के दिले. 

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या

रोहित शर्माच्या विकेटने एवढा 'राडा' झाला की ब्रॉडकास्टरला द्यावे लागले स्पष्टिकरण 

मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; RCB प्ले ऑफच्या शर्यतीतून झाले का बाद?  

पुन्हा घोळ! डेव्हॉन कॉनवे बाद असूनही नाबाद राहिला, सौरव गांगुलीलाही वाटले आश्चर्य 

 


अक्षरने बाद करण्यापूर्वी कॉनवेसाठी आणखी एकदा LBW ची अपील झाली आणि दिल्लीने यावेळी DRS घेतला. पण, चेंडू व बॅटचा स्पर्श झाल्याचे सांगून तिसऱ्या अम्पायरने कॉनवेला नाबाद दिले. मात्र, रिप्ले नीट पाहिल्यास चेंडू बॅटपासून दूर असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि त्यावरून पठाण म्हणाला, अम्पायर आज त्याचा चष्मा घालायला विसरलाय वाटतं.

अक्षर चांगली गोलंदाजी करताना दिसला अन् त्याने CSKच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले होते.  त्याला कुलदीप यादवची चांगली साथ मिळाली आणि त्याने DCला मोईन अलीची ( ७) विकेट मिळवून दिली. 

Web Title: IPL 2023, CSK vs DC Live Marathi : Umpire saying - “There are little spikes when the ball is next to bat and the umpire deems it not out”, Yusuf pathan - “umpire shayad apna chashma bhul gye” 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.