IPL 2023, CSK vs DC Live : ललित यादवचा 'क्रेझी' कॅच; अजिंक्य रहाणे बाद, अम्पायर आश्चर्यचकित, Video

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत आव्हान टिकवण्यासाठी कंबर कसून मैदानावर उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आज चांगला खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 08:46 PM2023-05-10T20:46:08+5:302023-05-10T20:49:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs DC Live Marathi : What a crazy catch by Lalit Yadav, Ajinkya Rahane dismissed for 21 in 20 balls, check Umpire Chris Gaffaney reaction, Video  | IPL 2023, CSK vs DC Live : ललित यादवचा 'क्रेझी' कॅच; अजिंक्य रहाणे बाद, अम्पायर आश्चर्यचकित, Video

IPL 2023, CSK vs DC Live : ललित यादवचा 'क्रेझी' कॅच; अजिंक्य रहाणे बाद, अम्पायर आश्चर्यचकित, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत आव्हान टिकवण्यासाठी कंबर कसून मैदानावर उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आज चांगला खेळ केला. चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर DCच्या फिरकीपटूंनी बॅकफूटवर फेकले. अक्षर पटेलने दोन, कुलदीप यादव व ललित यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेत CSKला मोठे धक्के दिले. अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आजही त्याच्या फॉर्मात दिसत होता, परंतु ललित यादवने त्याच्याच गोलंदाजीवर 'क्रेझी' झेल घेऊन त्याला माघारी पाठवले. अम्पायरही हा झेल पाहून आश्चर्यचकीत झाले. 


चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीच्या फिरकीपटूंनी त्यांना गिरकी घेण्यास भाग पाडले. यंदाच्या आयपीएलमधील यशस्वी जोडी ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांना आज ३२ धावांचीच सलामी देता आली. नशीबाची दोनवेळा साथ मिळालेल्या कॉनवेला ( १०) पाचव्या षटकात अक्षर पटेलने पायचीत केले. त्यानंतर ऋतुराजने ( २४)  पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला अन् अक्षरच्या चेंडूवर अमन खानच्या हाती झेल देऊन परतला. अक्षर चांगली गोलंदाजी करताना दिसला अन् त्याने CSKच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले होते.  त्याला कुलदीप यादवची चांगली साथ मिळाली आणि त्याने DCला मोईन अलीची ( ७) विकेट मिळवून दिली. 

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; RCB प्ले ऑफच्या शर्यतीतून झाले का बाद?  

पुन्हा घोळ! डेव्हॉन कॉनवे बाद असूनही नाबाद राहिला, सौरव गांगुलीलाही वाटले आश्चर्य 

अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'! 


Web Title: IPL 2023, CSK vs DC Live Marathi : What a crazy catch by Lalit Yadav, Ajinkya Rahane dismissed for 21 in 20 balls, check Umpire Chris Gaffaney reaction, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.