IPL 2023, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातही काही खास झालेली नाही. दीपक चहरने त्याच्या पहिल्या दोन षटकांत चेन्नई सुपर किंग्सला दोन मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर मिचेल मार्शही बाद झाला, पण अजिंक्य रहाणेच्या त्या कृतीची रंगलीय चर्चा... दिल्लीच्या ७ षटकांत ३ बाद ४८ धावा झाल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड ( २४) व डेव्हॉन कॉनवे ( १०) यांना आज ३२ धावांचीच सलामी देता आली. अजिंक्य रहाणे ( २१), शिवम दुबे ( २५ ) आणि अंबाती रायुडू ( २३) यांनी छोटेखानी खेळी केली. अंबातीची विकेट पडल्यानंतर चेपॉकवर जल्लोष सुरू झाला, कारण फलंदाजीला महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला होता. अखेरच्या तीन षटकांत धोनी व रवींद्र जडेजा या जोडीने चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी आजच्या सामन्यातील CSKसाठी सर्वोत्तम ३८ धावांची भागीदारीची नोंद केली. धोनीने १९व्या षटकात खलिल अहमदला ६,४,२,६ असे चोपले. २०व्या षटकात जडेजा ( २१) झेलबाद झाला. मार्शने त्याच षटकात ९ चेंडूंत २० धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. चेन्नईने ८ बाद १६७ धावा केल्या.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
अम्पायर त्याचा चष्मा विसरला! Spike नसतानाही CSKच्या बाजूने निर्णय, भडकला 'पठाण'!
ललित यादवचा 'क्रेझी' कॅच; अजिंक्य रहाणे बाद, अम्पायर आश्चर्यचकित, Video
रवींद्र जडेजाने Six मारताच 'मिस्ट्री गर्ल' खूश झाली, कॅमेराची नजर तिच्याकडेच वळली, Video
दिल्लीची सुरूवातही काही खास झाली नाही. दुसऱ्याच चेंडूवर दीपक चहरने DCचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला ( ०) झेलबाद केले. अजिंक्य रहाणेने सोपा झेल टिपला. फिल सॉल्ट चांगली फटकेबाजी करत होता आणि तिसऱ्या षटकात चहरने हाही काटा काढला. सॉल्ट ( १७) धावांवर अंबाती रायुडूच्या हाती झेल देऊन माघारी परतला. मनीष पांडे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला, परंतु त्याने फॉर्मात असलेल्या मिचेल मार्शला रन आऊट केला. तुषार देशपांडेच्या षटकात मनीषने चेंडूला दिशा दिली अन् धाव घेण्यासाठी त्याने क्रिज सोडली. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला मार्शही बराच पुढे आलेला, परंतु चेंडू अजिंक्य रहाणेच्या हाती पाहताच पांडे मागे फिरला. अजिंक्यने चेंडू तुषारकडे थ्रो न देता स्वतः तो बेल्स उडवण्यासाठी पळाला. मार्शनला माघारी परतण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि दिल्लीला २५ धावांत तिसरा धक्का बसला.