IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) शड्डू ठोकून उभा राहिला आहे. डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स व मोईन अली हे परदेशी खेळाडू माघारी परतल्यानंतर अहमदाबादच्या स्टेडियमवर मराठी आव्वाज घुमला. ऋतुराजने चतुराईने फटकेबाजी करताना २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल २०२३ मध्ये पहिली धाव, पहिला चौकार, पहिला षटकार अन् पहिल्या अर्धशतकाचा पराक्रम ऋतुराजच्या नावावर नोंदवला गेला.
मोहम्मद शमीने भन्नाट चेंडू टाकून इतिहास घडविला, राशीद खानने CSK च्या २ स्टार्सना तंबूचा रस्ता दाखवला
डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी सावध सुरूवात केली होती. पण, मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेचा त्रिफळा उडवून चेन्नईला १४ धावांवर पहिला धक्का दिला. शमीची ही आयपीएलमधील १००वी विकेट ठरली. ऋतुराज व मोईन अली यांनी चांगले फटकेबाजी CSK चा धावफलक हलता ठेवला. हार्दिकने गोलंदाजीत बदल करताना राशीद खानला आणले आणि त्याने पहिल्याच षटकात अलीची ( २३) विकेट घेतली. विकेट पडूनही चेन्नईच्या धावांचा ओघ आटला नव्हता. ऋतुराजने हार्दिकच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचून येलो आर्मीला खूश केले.
राशीदने CSK ला आणखी एक धक्का देताना बेन स्टोक्सला बाद केले. स्टोक्स व अली यांचे सुरेख झेल यष्टिंमागे वृद्धीमान साहाने टिपले. पण, ऋतुराज थांबण्यातला नव्हता आणि त्याने अल्झारी जोसेफला दोन षटकार खेचून २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईने ११ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs GT Live : 23 balls fifty for Ruturaj Gaikwad. He scored 50* runs from 23 balls including 3 Fours and 5 Sixes against GT
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.