IPL 2023, CSK vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला आजपासून सुरूवात होत आहे.. गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली Gujarat Titansने पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले आणि ते कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे हार्दिक व त्याच्या संघावर दडपण नक्की असले.
मुंबई इंडियन्सची घोषणा, बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना हार्दिकने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तो आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे आणि बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी जवळपास सोपवली आहे. मागच्या आयपीएलमध्ये हार्दिकने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि १५ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स याने हार्दिकला CSK चा सामना करण्यापूर्वी एक सल्ला दिला आहे.
''माझ्या मते हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला नहो. त्याच्यासाठी ५ किंवा ६ वा क्रमांक योग्य आहे, त्यातल्या त्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास योग्यच ठरेल. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन आणि सामन्यातील परिस्थितीनुसार त्याने निर्णय घ्यायला हवा, परंतु माझ्या मते पाचवा क्रमांक त्याच्यासाठी चांगला आहे. या संघात डेव्हिड मिलर आहे, तेवाटिया आणि राशीद खान हे सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आहे. त्यामुळे डावखुऱ्या फलंदाजांमध्ये हार्दिकने पाचव्या, मिलरने चौथ्या आणि तेवाटियाने सहाव्या क्रमांकावर खेळायला हवे,''असे एबीने जिओ सिनेमावर सांगितले.
गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या, राशिद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, साई किशोर, राहुल तेवाटिया, साई सुदर्शन, अभिवन मनोहर, वृद्धीमान सहा, मॅथ्यू वेड, नूर अहमद, प्रदीप सांगवान, केन विलियम्सन, ओडिन स्मिथ, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशूआ लिटल, मोहित शर्मा.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"