Join us  

IPL 2023, CSK vs GT Live : CSK च्या फॅनसाठी वाईट बातमी; महेंद्रसिंग धोनी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

IPL 2023, CSK vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 5:14 PM

Open in App

IPL 2023, CSK vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. आयपीएलला सुरूवात होण्याआधीच बऱ्याच संघांना दुखापतीचा फटका बसला आहे आणि CSK च्या मुकेश चौधरीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४१ वर्षीय धोनीच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

MS Dhoni ला हरवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स आला, म्हणाला...

धोनी हा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०० विजय मिळवणारा एकमेव खेळाडू आहे आणि त्याने CSK ला चार जेतेपदं जिंकून दिली आहेत. महेंद्रसिंग धोनीने २३४ आयपीएल सामन्यांत ४९७८ धावा केल्या आहेत आणि १३५ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. गुरुवारी धोनीने CSK च्या सराव सत्रातही सहभाग न घेतल्याने या चर्चांना खतपाणी मिळाले आहे. नाणेफेक होईपर्यंत धोनी आज खेळणार की नाही याबाबतचे स्पष्टता मिळणार नाही. धोनीच्या गैरहजेरीत CSKकडे यष्टिरक्षणासाठी पर्याय उपलब्ध नाहीत, अशात आज नेमकं काय घडतं याची उत्सुकता आहे.

डेव्हॉन कॉनवे व अंबाती रायुडू यांच्याकडे यष्टिंमागे खेळण्याचा अनुभव आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना रायुडूने यष्टिरक्षण केले होते. धोनीच्या गैरहजेरीत बेन स्टोक्स नेतृत्व करताना दिसू शकतो. मागील पर्वात CSK ने नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली होती, परंतु संघाची कामगिरी पाहून पुन्हा ती धोनीकडे देण्यात आली.  

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीगुजरात टायटन्स
Open in App