Join us  

IPL 2023, CSK vs GT Live : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली; धोक्याचा इशारा देतेय आकडेवारी

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 7:17 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या खेळण्यावर साशंकता होती. कारण काल त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ४१ वर्षीय धोनी हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीचीच क्रेझ पाहायला मिळाली.. CSK च्या पिवळ्या जर्सीतील चाहत्यांची संख्या ही घरच्या संघापेक्षा अधिक दिसली.  २०२२ ला उभय संघांत दोन साखळी सामने झाले. दोन्ही सामन्यांत गुजरातने CSKवर मात केली. पहिल्या सामन्यात ३, तर दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून गुजरातने विजय मिळवला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणारा संघ ७ वेळा जिंकला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला १३ वेळा यश मिळालं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून कोणता संघ काय निर्णय घेतो याची उत्सुकता आहे. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स व मिचेल सँटनर या चार परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार आहेत.  रवींद्र हंगर्गेकर आणि बेन स्टोक्स आज CSK कडून पदार्पण करत आहेत.

आज कोणते रेकॉर्ड मोडणार...

  • मोहम्मद शमीला आयपीएलमध्ये विकेट्सचं  शतक पूर्ण करण्यासाठी १ बळी हवा आहे
  • महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्सकडून षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी १ मोठा फटका मारायचा आहे
  • आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी महेंद्रसिंग धोनीला २२ धावा करायच्या आहेत
  • हार्दिक पांड्याने आज ३७ धावा केल्यास तो आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडेल

 

 चेन्नई सुपर किंग्स - डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, दीपक चहर, रवींद्र हंगर्गेकर ( CSK XI: 1 Devon Conway, 2 Ruturaj Gaikwad, 3 Moeen Ali, 4 Ben Stokes, 5 Ravindra Jadeja, 6 Shivam Dube, 7 Ambati Rayudu, 8 MS Dhoni (capt&wk), 9 Mitch Santner, 10 Deepak Chahar, 11 Rajvardhan Hangargekar)

 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App