IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला. त्याने ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९२ धावांची खेळी करताना चेन्नईला मजबूत स्थितीत आणले. मोईन अली ( २३), शिवम दुबे ( १९), महेंद्रसिंग धोनी ( १४*) आणि अंबाती रायुडू ( १२) हे चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. गुजरातच्या राशीद खान ( २-२६), मोहम्मद शमी ( २-२९) व अल्झारी जोसेफ ( २-३३) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चेन्नईच्या धावांना लगाम लावला. धोनीने अखेरच्या षटकात चांगले फटके मारले अन् चेन्नईने ७ बाद १७८ धावा केल्या. धोनी ७ चेंडूंत १४ धावांवर नाबाद राहिला.
ऋतुराज गायकवाडने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. आयपीएलमझ्ये ३७ इनिंग्जमध्ये सर्वाधिक १२९९ धावांचा विक्रम ऋतुराजच्या नावावर नोंदवला गेला. सचिन तेंडुलकरने १२७१ धावा केल्या होत्या. या दोघांनंतर रिषभ पंत ( ११८४), सुरेश रैना ( ११०२) आणि देवदत्त पडिक्कल ( १०८३) यांचा क्रमांक येतो. शिवाय गुजरात टायटन्सविरुद्ध सर्वाधिक धावा ( २१८), सर्वाधिक षटकार ( १५), सर्वाधिक ५०+ धावा ( ३) आणि सर्वोत्तम खेळी ( ९२) असे सर्व विक्रम ऋतुराजने आज नावावर केलेत.
धोनीने अंबाती रायुडूच्या जागी गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande) याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले. वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांनी तुषारच्या पहिल्या षटकात १५ धावा चोपल्या. त्यानंतर धोनीने गोलंदाजीत लगेच बदल केला आणि तो यशस्वी ठरला. राजवर्धन हंगर्गेकरने त्याच्या पहिल्या षटकात साहाची ( २५) विकेट घेतली. शिवम दुबेने सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. केन विलियम्सनच्या जागी गुजरातने साई सुदर्शनला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले. ( Sai Sudharsan has replaced Kane Williamson as an impact player.) शुबमनने चांगली फटकेबाजी करताना गुजरातला ५ षटकांत १ बाद ५६ धावांपर्यंत पोहोचवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"