IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडत आहेत. मोहम्मद शमीने तिसऱ्याच षटकात CSK ला मोठा धक्का देताना डेव्हॉन कॉनवेचा त्रिफळा उडवला. यंदाच्या आय़पीएलमध्ये Impact Player ही नवीन संकल्पना आणली गेली आहे आणि त्यामुळे पहिलाच सामना असल्याने CSK व GT यांनी कोणते पाच खेळाडू Impact Player म्हणून निवडले आहेत, याची सर्वांना उत्सुकता आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणारा संघ ७ वेळा जिंकला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला १३ वेळा यश मिळालं आहे. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स व मिचेल सँटनर या चार परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार आहेत. मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेचा त्रिफळा उडवून चेन्नईला १४ धावांवर पहिला धक्का दिला. शमीची ही आयपीएलमधील १००वी विकेट ठरली.
- चेन्नई सुपर किंग्स - डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, दीपक चहर, रवींद्र हंगर्गेकर
- गुजरात टायटन्स - शुबमन गिल, वृद्धीमान साहा, केन विलियम्सन, हार्दिक पांड्या, विजय शंकर, राहुल तेवाटिया, राशीद खान, मोहम्मद शमी, जोस लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ,
काय सांगतो इम्पॅक्ट खेळाडूचा नियम?
टॉसच्या वेळी कॅप्टनकडे प्लेइंग इलेव्हनची दोन टीम शीट असेल. ११ खेळाडूंसह पाच पर्यायी खेळाडूंचीही नावे असतील. हेच पर्यायी खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकतात. आयपीएलमध्ये प्रथमच इम्पॅक्ट प्लेअरचा वापर पाहायला मिळणार आहे. एक संघ एका सामन्यात फक्त एकदाच इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकतो. ज्या पाच पर्यायी खेळाडूंची नावे कर्णधाराने नाणेफेकीच्या वेळी विरोधी कर्णधाराला दिली होती, त्यातूनच हा खेळाडू निवडला जाऊ शकतो.
भारतीय किंवा परदेशी कोणताही खेळाडू हा खेळाडू बनू शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये आधीच चार नावे असल्यास, इम्पॅक्ट खेळाडू म्हणून केवळ भारतीय चेहरा येऊ शकतो. फलंदाजी करणाऱ्या संघाने प्रभावशाली खेळाडू घेतल्यास तो प्लेइंग इलेव्हनमध्ये तोपर्यंत फलंदाजी न केलेल्या कोणत्याही खेळाडूची जागा घेईल. गोलंदाजी करणारा संघ षटकांचा कोटा संपल्यानंतर आपल्या कोणत्याही खेळाडूच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू घेऊ शकतो.
चेन्नईचे राखीव खेळाडू - अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, सुभ्रांषू सेनापती, शेख राशीद, निशांक सिंधू
गुजरातचे राखीव खेळाडू - बी साई सुधारन, जयंत यादव, मोहीत शर्मा, अभिनव मनोहर, केएस भरत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs GT Live : Mahendra Singh Dhoni to play Ajinkya Rahane as Impact Player? The impact player list for Chennai Super kings and Gujarat Titans, Mohammad Shami cleans up Conway - 100th wicket in IPL.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.