IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडत आहेत. तिसऱ्या षटकात विकेट पडूनही चेन्नईने धावांचा वेग कायम राखला आहे. ऋतुराज गायकवाड एका बाजूने खिंड लढवताना दिसतोय. हार्दिक पांड्याने गोलंदाजीत बदल करून राशीद खानला आणण्याचा निर्णय योग्य ठरला. जागतिक क्रमावारीत नंबर गोलंदाजाने मोईन अली व बेन स्टोक्स या स्टार्सना माघारी पाठवले. वृद्धीमान सहाने यष्टींमागे चांगले झेल टिपले.
महेंद्रसिंग धोनी Impact Player म्हणून अजिंक्य रहाणेला खेळवणार? गुजरातनेही राखून ठेवले पाच एक्के
हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी सावध सुरूवात केली होती. पण, मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेचा त्रिफळा उडवून चेन्नईला १४ धावांवर पहिला धक्का दिला. शमीची ही आयपीएलमधील १००वी विकेट ठरली. भुवनेश्वर कुमार ( १५४), जसप्रीत बुमराह ( १४५), उमेश यादव ( १३५), संदीप शर्मा ( ११४), आशीष नेहरा ( १०६), विनय कुमार ( १०५) आणि जहीर खान ( १०२) यांच्यानंतर आयपीएलमध्ये १००+ विकेट्स घेणारा शमी आठवा भारतीय गोलंदाज ठरला. ऋतुराज व मोईन अली यांनी चांगले फटकेबाजी करताना ९+च्या सरासरीने CSK चा धावफलक हलता ठेवला. हार्दिकने गोलंदाजीत बदल करताना राशीद खानला आणले आणि त्याने पहिल्याच षटकात अलीची ( २३) विकेट घेतली.
विकेट पडूनही चेन्नईच्या धावांचा ओघ आटला नव्हता. ऋतुराजने हार्दिकच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचून येलो आर्मीला खूश केले. राशीदने CSK ला आणखी एक धक्का देताना बेन स्टोक्सला बाद केले. स्टोक्स व अली यांचे सुरेख झेल यष्टिंमागे वृद्धीमान साहाने टिपले., चेन्नईने ७० धावांत ३ फलंदाज गमावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"