Join us  

IPL 2023, CSK vs GT Live : ४ चौकार, ९ षटकारांसह ९२ धावा! ऋतुराज गायकवाडच्या विकेटने मात्र आणलं वादाचं वादळ 

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live :  ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) ने गुजरात टायटन्सची अवस्था बेक्कार केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 9:22 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live :  ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) ने गुजरात टायटन्सची अवस्था बेक्कार केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर MS Dhoni चेच चाहते अधिक दिसत असताना CSK च्या पाठीराख्यांना ऋतुराजने त्याच्या केळीने मंत्रमुग्ध केले. बेन स्टोक्स, मोईन अली, डेव्हॉन कॉनवे हे परदेशी खेळाडू अपयशी ठरताना ऋतुराज दमदार खेळला. गुजरातच्या गोलंदाजांची त्याने यथेच्छ धुलाई केली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना ऋतुराजची विकेट पडली, परंतु त्याने आता वाद सुरू झालाय... 

ऋतुराज गायकवाडला रोखण्याच्या प्रयत्नात गुजरातच्या स्टार खेळाडूने मोडून घेतला पाय, सोडावे लागले मैदान

मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेचा ( १) त्रिफळा उडवला. ऋतुराज व मोईन अली ( २३) यांनी चांगले फटकेबाजी केली. परंतु, हार्दिकने गोलंदाजीत बदल करताना राशीद खानला आणले.त्याने अलीची ( २३) आणि नंतर बेन स्टोक्सची ( ७)  विकेट घेतली. ऋतुराज थांबण्यातला नव्हता आणि त्याने अल्झारी जोसेफला दोन षटकार खेचून २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अंबाती रायुडू ( १२) फार कमाल करू शकला नाही आणि आयर्लंडचा गोलंदाज जोशूआ लिटलने त्याचा त्रिफळा उडवला. 

दरम्यान, ऋतुराजचा षटकार रोखण्यासाठी केन विलियम्सनने हवेत झेप घेतली अन् त्या प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याला मैदानाबाहेर जावे लागले. अल्झारी जोसेफने १८व्या षटकात अखेर ऋतुराजची विकेट मिळवली. फुलटॉस चेंडूवर ऋतुने फटका खेचला अन् शुबमन गिलने तितकाच सुरेख झेल टिपला. ऋतुराजने ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९२ धावा केल्या. गुजरात टायटन्सविरुद्धची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी जोस बटलरने ८९ धावा केल्या होत्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३ऋतुराज गायकवाडचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App