IPL 2023, CSK vs GT Live : १३ चेंडू ७० धावा! ऋतुराज गायकवाड कसला खेळला भावा, अहमदाबादमध्ये त्याचीच हवा

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या  ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 09:35 PM2023-03-31T21:35:06+5:302023-03-31T21:35:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs GT Live : Ruturaj Gaikwad scored 92 runs from 50 balls including 4 fours and 9 sixes, CSK finish with 178/7 | IPL 2023, CSK vs GT Live : १३ चेंडू ७० धावा! ऋतुराज गायकवाड कसला खेळला भावा, अहमदाबादमध्ये त्याचीच हवा

IPL 2023, CSK vs GT Live : १३ चेंडू ७० धावा! ऋतुराज गायकवाड कसला खेळला भावा, अहमदाबादमध्ये त्याचीच हवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या  ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला. गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजचे नाणे खणखणीत वाजले. त्याने ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९२ धावांची खेळी करताना चेन्नईला मजबूत स्थितीत आणले, परंतु अखेरच्या काही षटकात गुजरातने कमबॅक केले. 

४ चौकार, ९ षटकारांसह ९२ धावा! ऋतुराज गायकवाडच्या विकेटने मात्र आणलं वादाचं वादळ 

मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेचा ( १) त्रिफळा उडवला. ऋतुराज व मोईन अली ( २३) यांनी चांगले फटकेबाजी केली. परंतु, हार्दिकने गोलंदाजीत बदल करताना राशीद खानला आणले.त्याने अलीची ( २३) आणि नंतर बेन स्टोक्सची ( ७)  विकेट घेतली. ऋतुराज थांबण्यातला नव्हता आणि त्याने अल्झारी जोसेफला दोन षटकार खेचून २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अंबाती रायुडू ( १२) अपयशी ठरला आणि आयर्लंडचा गोलंदाज जोशूआ लिटलने त्याचा त्रिफळा उडवला. 


दरम्यान, ऋतुराजचा षटकार रोखण्यासाठी केन विलियम्सनने हवेत झेप घेतली अन् त्या प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याला मैदानाबाहेर जावे लागले. अल्झारी जोसेफने १८व्या षटकात अखेर ऋतुराजची विकेट मिळवली. फुलटॉस चेंडूवर ऋतुने फटका खेचला अन् शुबमन गिलने तितकाच सुरेख झेल टिपला. ऋतुराजने ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९२ धावा केल्या. रवींद्र जडेजा ( १) व शिवम दुबे ( १९) हेही फार कमाल करू शकले नाहीत. धोनीने अखेरच्या षटकात चांगले फटके मारले अन् चेन्नईने ७ बाद १७८ धावा केल्या. धोनी ७ चेंडूंत १४ धावांवर नाबाद राहिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, CSK vs GT Live : Ruturaj Gaikwad scored 92 runs from 50 balls including 4 fours and 9 sixes, CSK finish with 178/7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.