IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) ने गुजरात टायटन्सची अवस्था बेक्कार केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर MS Dhoni चेच चाहते अधिक दिसत असताना CSK च्या पाठीराख्यांना ऋतुराजने त्याच्या केळीने मंत्रमुग्ध केले. आयपीएल २०२३ मध्ये पहिली धाव, पहिला चौकार, पहिला षटकार अन् पहिल्या अर्धशतकाचा पराक्रम ऋतुराजने केले. त्याला रोखण्याच्या प्रयत्ना
गुजरातमध्ये घुमला मराठी आव्वाज... 'ऋतू'राज! अवघ्या २३ चेंडूत ठोकलं अर्धशतक
मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात डेव्हॉन कॉनवेचा त्रिफळा उडवला. ऋतुराज व मोईन अली यांनी चांगले फटकेबाजी केली. परंतु, हार्दिकने गोलंदाजीत बदल करताना राशीद खानला आणले.त्याने अलीची ( २३) आणि नंतर बेन स्टोक्सची विकेट घेतली. ऋतुराज थांबण्यातला नव्हता आणि त्याने अल्झारी जोसेफला दोन षटकार खेचून २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अंबाती रायुडू ( १२) फार कमाल करू शकला नाही आणि आयर्लंडचा गोलंदाज जोशूआ लिटलने त्याचा त्रिफळा उडवला.
दरम्यान, ऋतुराजचा षटकार रोखण्यासाठी केन विलियम्सनने हवेत झेप घेतली अन् चेंडू पकडला, परंतु त्याचा तोल सीमारेषेपार गेला. पाय टेकण्यापूर्वी त्याने चेंडू आत फेकला, मात्र या प्रयत्नात त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले. केनने षटकार रोखला, परंतु तरीही ऋतुराजला चार धावा मिळाल्या. पण, गुजरातला केनच्या रुपाने मोठा धक्का बसला. गुजरातचे मुख्य प्रशिक्षक गॅरी क्रिस्टन यांनीही केनच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"