Join us  

IPL 2023, CSK vs KKR Live : कोलकाताने Play Offs च्या आशा जीवंत ठेवल्या; रिंकू सिंग-नितीश राणाने सामना फिरवला

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 11:01 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. KKR ने हा सामना जिंकून Play Offsच्या शर्यतीत स्वतःला कायम राखताना १३ सामन्यांत १२ गुणांची कमाई केली. CSK १३ सामन्यांत १५ गुणांसह अजूनही Point Table मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना क्वालिफायर १ मध्ये खेळण्यासाठी अखेरचा साखळी सामना जिंकावा लागणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यात KKRला लखनौचा, तर CSK ला दिल्लीचा सामना करावा लागणार आहे. पण, KKRला विजयासह अन्य संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार आहे. 

कोलकाताने फिरकीपटूंचा चांगला वापर करून घेताना चेन्नईला सुरुवातीला कोंडीत पकडले होते. फलकावर ३१ धावा असातना ऋतुराज गायकवाड ( १७) माघारी परतला. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे व अजिंक्य रहाणे ( १६) यांनी डाव सावरला. पण, ६१ धावा असताना अजिंक्य बाद झाला अन् पुढे १२ धावांत आणखी तीन फलंदाज बाद झाल्याने चेन्नईची अवस्था ५ बाद ७२ अशी झाली. शिवम दुबे व रवींद्र जडेजा या जोडीने ५३ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली. जडेजा २० धावांवर बाद झाला. शिवम ३४ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ६ बाद १४४ धावा केल्या.

दीपक चहरने पहिल्याच षटकात KKRचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाजला ( १) बाद केले. तुषार देशपांडेने  सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या वेंकटेश अय्यरने दोन चौकार खेचून CSKचं टेंशन वाढवले, परंतु MS Dhoni ने क्षेत्ररक्षणात बदल करताना रवींद्र जडेजाला दुसऱ्या स्लीपवर उभं केलं अन् दीपक चहरच्या चेंडूवर अय्यर ( ९) झेलबाद होऊन माघारी परतला. दीपक चहरने KKRला तिसरा आणि मोठा धक्का देताना जेसन रॉयला (१२) माघारी जाण्यास भाग पाडले. KKRला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ४६ धावा करता आल्या. ( दिपक चहरने दिले धक्के Video   )

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या  

चेन्नई सुपर किंग्स आज हरले, आता काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरला 'बाजीगर'!

Out or not out ? देवदत्त पडिक्कलची वादग्रस्त विकेट? RR ६ बाद ३१ धावा, Video

५९ All Out! RRने स्वतःसाठी 'खड्डा' खणला; RCBचे Play Offs च्या शर्यतीत कमबॅक

 

पण, नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी CSKच्या मेहनतीवर पाणी फिरवले. दोघांनी ५०+ धावांची भागीदारी करताना KKRच्या विजयाच्या आशा अधिक मजबूत केल्या. रिंकूने ३९ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील तिसरे अर्धशतक झळकावले. आता २४ चेंडूंत १९ धावाच KKRला करायच्या होत्या. राणानेही ३८ चेंडूंत या पर्वातील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. रिंकू ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर रन आऊट झाला आणि नितीशसह त्याची ९९ ( ७६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. KKR ने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा करून मॅच जिंकली. नितीश ५७ धावांवर नाबाद राहिला.  

 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सरिंकू सिंग
Open in App