IPL 2023, CSK vs KKR Live : १२ धावांत ४ विकेट! शिवम दुबे- रवींद्र जडेजा जोडीने दिला CSKला आधार

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना Play Offs च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:08 PM2023-05-14T21:08:17+5:302023-05-14T21:19:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs KKR Live Marathi : Shivam Dubey- Ravindra Jadeja 68 runs partnership for the sixth wicket, Chennai Super Kings 144/6 | IPL 2023, CSK vs KKR Live : १२ धावांत ४ विकेट! शिवम दुबे- रवींद्र जडेजा जोडीने दिला CSKला आधार

IPL 2023, CSK vs KKR Live : १२ धावांत ४ विकेट! शिवम दुबे- रवींद्र जडेजा जोडीने दिला CSKला आधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना Play Offs च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. CSK आज हरली तरी त्यांना संधी असेल, परंतु KKRसाठी हा सामना करो वा मरो असाच आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी उल्लेखनीय झालेली पहिल्या टप्प्यात तरी दिसली. वरुण चक्रवर्थी, सुनील नरीन आणि सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजांनी CSKच्या धावगतीवर नियंत्रण ठेवले होते. नरीन व चक्रवर्थी यांनी प्रत्येकी दोन धक्के देत CSKच्या ४ फलंदाजांना अवघ्या १२ धावांत माघारी पाठवले. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या जोडीने CSKच्या डावाला आकार दिला अन् सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. 

चेपॉकवरील यंदाच्या पर्वातील हा साखळी फेरीतील CSK चा अखेरचा सामना असल्याने चाहते मोठ्या संख्येने MS Dhoni ला पाहण्यासाठी आले होते. CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांनी सावध सुरूवात करून दिली अन् चौथ्या षटकात वरुण चक्रवर्थीने KKRला विकेट मिळवून दिली. ऋतुराजृ १७ धावांवर वैभव अरोराच्या हाती झेल देऊन माघारी परतला.  अजिंक्य रहाणे व कॉनवे ही जोडी चांगली खेळ करताना दिसली. दोघांनी २७ चेंडूंत ३० धावा जोडल्या, परंतु चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर घाई रहाणेला नडली ( १६) आणि KKRला दुसरी मोठी विकेट मिळाली.


कोलकाताचे फिरकीपटू आज वर्चस्व गाजवताना दिसले आणि त्यात शार्दूल ठाकूरने मोठी विकेट मिळवून दिली. ३० धावांवर कॉनवेला त्याने बाद केले. त्यानंतर सुनील नरीनने एकाच षटकात अंबाती रायुडू ( ४) व मोईन अली ( १) यांचा त्रिफळा उडवला. CSKचा निम्मा संघ ७२ धावांवर माघारी परतला. नरीनच्या ४ षटकांत १५ धावा आल्या अन् २ विकेट्स पडल्या. KKRने त्यांच्या फिरकी अस्त्रांचा सातत्याने वापर करून CSKच्या धावगतीला वेसण घातले होते.  ( नरीनने दिले दोन धक्के पाहा Video ) शिवम दुबे हात मोकळे करताना दिसला, परंतु रवींद्र जडेजा सावध पवित्र्यातच होता. 

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या  

चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास, काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरणार 'बाजीगर'!

Out or not out ? देवदत्त पडिक्कलची वादग्रस्त विकेट? RR ६ बाद ३१ धावा, Video

५९ All Out! RRने स्वतःसाठी 'खड्डा' खणला; RCBचे Play Offs च्या शर्यतीत कमबॅक

१७व्या षटकात जडेजाने षटकाराने सुरुवात केली. त्याच षटकात शिवमनेही षटकार खेचला आणि त्या षटकात १६ धावा आल्या. जडेजाने शिवमला स्ट्राईक देण्याची भूमिका बजावली अन् त्याने चांगली फटकेबाजी केली. चक्रवर्थीच्या शेवटच्या षटकात १५ धावा चोपून शिवम व जडेजाने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. शार्दूलने १९वे षटक अप्रतिम टाकले अन् केवळ ५ धावा दिल्या. निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे असल्याने KKRला सर्कलबाहेर एक खेळाडू कमी करावा लागला. यंदाच्या पर्वात शिवमने १७ षटकार खेचले अन् CSK कडून एका पर्वात सर्वाधिक १६ षटकार खेचणाऱ्या ड्वेन ब्राव्होचा ( २०१४) विक्रम शिवमने मोडला.

जडेजा २० धावांवर बाद झाला अन् शिवमसह त्याची ६८ ( ५३ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. शेवटच्या दोन चेंडूंसाठी MS Dhoni मैदानावर आला अन् एकच जयघोष झाला. शिवम ३४ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईला ६ बाद १४४  धावा करता आल्या.

Web Title: IPL 2023, CSK vs KKR Live Marathi : Shivam Dubey- Ravindra Jadeja 68 runs partnership for the sixth wicket, Chennai Super Kings 144/6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.