IPL 2023, CSK vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) रविवारी एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) ६ विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नईचे १४५ धावांचे लक्ष्य KKR ने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा करत पार केले. रिंकू सिंग ( ५४) आणि कर्णधार नितीश राणा ( ५७) यांची ९९ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. पण, या सामन्यानंतर बीसीसीआयने नितीशला २४ लाखांचा दंड ठोठावला आणि शिवाय KKR च्या सर्व खेळाडूंना (जे CSK विरुद्धच्या सामन्यात KKR च्या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट होते) त्यांच्या मॅच फी मधून प्रत्येकी ६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिवम दुबेच्या नाबाद ४८ धावांमुळे संघाला १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. पॉवरप्लेमध्ये KKRने ३ विकेट्स गमावल्या होत्या, त्यानंतर संघ दडपणाखाली होता. पण, रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी अर्धशतकीय खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. KKRला वेळेपूर्वी षटक पूर्ण करता आली नाही आणि त्यामुळे शेवटच्या षटकात त्यांना १ खेळाडू ३० यार्ड सर्कलबाहेर कमी उभा करावा लागला. नितीशही अम्पायरशी वाद घालताना दिसला.
मॅच संपल्यानंतर नितीशच्या फीमधून २४ लाख रुपये दंड वजा करण्यात आले, कारण त्याला षटकं निर्धारित वेळेत पूर्ण करून घेता आली नाहीत. KKRची ही दुसरी चूक होती, त्यामुळे कर्णधाराला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...!
IPL 2023 Play Offs Scenario : CSKची संधी ३८ टक्क्यांवर आली; KKRसह १२ गुण असलेल्या ४ संघांत शर्यत लागली
पेनसाठी धावाधाव अन् धोनी जवळ येताच शर्टवर घेतली ऑटोग्राफ; सुनील गावसकरांनी जिंकली मनं
Slow over rate rule...
ट्वेंटी-२० मध्ये एक डाव संपण्यासाठी दीड तास पुरेसा मानला जातो, त्यामुळे त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास, ३० यार्ड लाइनच्या आत एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो. ज्यामुळे अंतिम षटकांमध्ये गोलंदाजांना मोठी किंमत मोजावी लागते. प्रथमच अशी चूक झाल्यास कर्णधाराला १२ लाखांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा झाल्यास कर्णधाराला दुप्पट म्हणजे २४ लाख रुपयांचा दंड आणि इतर सर्व खेळाडूंसह ६-६ लाखांचा दंड ठोठावला जातो. अशी चूक तिसऱ्यांदा घडल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
Web Title: IPL 2023, CSK vs KKR : Nitish Rana fined 24 Lakhs for maintaining slow overrate against Chennai Super Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.