Join us  

IPL 2023, CSK vs LSG Live : MS Dhoniचं टेंशन मीटलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवून 'वजनदार' गोलंदाज चेन्नईत दाखल 

IPL 2023, CSK vs LSG Live :  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चांगली सुरुवात झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 6:22 PM

Open in App

IPL 2023, CSK vs LSG Live :  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या सामन्यात CSKला गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून ( GT)  पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्याच्या संघाने ५ विकेट्सने सामना सहज जिंकला. CSKची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसली होती, परंतु एक 'वजनदार' खेळाडू माहीचा टेंशन दूर करण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना प्रतिस्पर्धींचा निम्मा संघ तंबूत पाठवला.  

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला ( Sisanda Magala) याने वन डे क्रिकेटमध्ये कहर करत आहे. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात वन डे मालिकेतील दुसरा सामना नुकताच खेळला गेला ज्यामध्ये CSKच्या वेगवान गोलंदाजाने ९ षटकांत ४३ धावा देऊन ५ बळी घेतले. मगालाने ९ षटकांत २ षटकं निर्धाव टाकले. या गोलंदाजाचा चेन्नई सुपर किंग्जने कायले जेम्सच्या जागी संघात समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स मालिका संपल्यामुळे, सिसांडा मगाला चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला आहे. पण, आज त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. मगालाचे वजन ७०  किलोपेक्षा जास्त आहे, परंतु त्याचा वेग आणि हार्ड हिटिंगचा संघाला फायदा होतो.   मगालाने पहिल्या सामन्यात ३ आणि  दुसऱ्या सामन्यात ५ बळी घेतले. मगालाने वन डेत सहा डावांत १४ आणि सहा ट्वेंटी-२० सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्समहेंद्रसिंग धोनी
Open in App