IPL 2023 CSK vs LSG Live : १४२६ दिवसानंतर महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळणार आहेत. चेपॉकवर खेळलेल्या ६० पैकी ४१ सामन्यांत CSK ने विजय मिळवले आहेत आणि धोनीने येथे ४८ डावांत ४३.९७च्या सरासरीने १३६३ धावा केल्या आहेत. ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नईने येथे RR विरुद्ध ५ बाद २४६ ही सर्वोत्तम धावसंख्या उभी केली होती. सुरेश रैनाने चेपॉकवर सर्वाधिक १४९८ धावा केल्या आहेत आणि यंदा प्रथमच त्याच्याशिवाय CSK येथे खेळणार आहे. ३ वर्ष, १० महिने, ३ आठवडे आणि ४ दिवसांनी धोनीला चेपॉकवर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमही खचाखच भरले आहे.
MS Dhoniचं टेंशन मीटलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवून 'वजनदार' गोलंदाज चेन्नईत दाखल
चेन्नईची आयपीएल २०२३ मधील सुरुवात काही खास झाली नाही आणि पहिल्याच सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली. ऋतुराज गायकवाड वगळता CSKच्या अन्य फलंदाजांना प्रभाव पाडता आलेला नव्हता. गोलंदाजीतही माहीचे डावपेच चुकले. त्यामुळे आता घरच्या मैदानावर विजयी सुरूवात करण्यासाठी CSK सज्ज आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे CSKसमोर तडगे आव्हान असेल हे निश्चित आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने चेपॉकवर ५६ पैकी ४० सामने जिंकले आहेत.
लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. LSG ने जयदेव उनाडकटच्या जागी आज यश ठाकूरला संधी दिली आहे. महेंद्रसिंग धोनी येताच स्टेडियमवर एकच जल्लोष झाला आणि त्यामुळे तो काय बोलतोय हेच स्पष्ट ऐकू येत नव्हते. चेन्नईच्या ताफ्यात कोणताच बदल नसल्याचे धोनीने म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"