IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : १४२६ दिवसं चेन्नई सुपर किंग्सचे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो आज उजाडला... ३ वर्ष, १० महिने, ३ आठवडे आणि ४ दिवसांनी CSK आणि महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेपॉकवर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमही खचाखच भरले आहे. पण, धोनीला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षकांना अखेरच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली आणि त्यांना सबुरीचे फळ मिळाले. MS Dhoni तीन चेंडू खेळला अन् त्यातही त्याने चेपॉकवर माहौल बनवला.. कॅप्टन कूल मैदानावर येताच चेपॉक धोनीच्या नावाने दणाणून निघाले. धोनीनेही सलग दोन षटकार खेचून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि मोठा विक्रम नोंदवला.
ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने Tiagoचा पत्रा चेपला, उलट TATAच ५ लाख रुपये देणार
महेंद्रसिंग धोनीने ३ चेंडूंत १२ धावा करताच आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारा तो सातवा व भारताचा पाचवा खेळाडू ठरला. विराट कोहली ६७०६ धावांसह या विक्रमात आघाडीवर आहे. त्यानंतर शिखर धवन ( ६२८४), डेव्हिड वॉर्नर ( ५९३७), रोहित शर्मा ( ५८८०), सुरेश रैना ( ५५२८), एबी डिव्हिलियर्स ( ५१६२) यांचा क्रमांक येतो. धोनीने २३६ सामन्यांत २०८ डावांत ५०००+ धावांचा टप्पा गाठला.
तत्पूर्वी, डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋतुराज ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. कॉनवेने २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांवर माघारी परतला. शिवम दुबेने १६ चेंडूंत २७ धावा आणि मोईन अली १९ धावा करून माघारी परतले. बेन स्टोक्स व रवींद्र जडेजा अपयशी ठरले. जडेजा १ धावेवर माघारी परतला अन् MS Dhoni मैदानावर आला. चेपॉकवर प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. धोनीनेही सलग दोन षटकार खेचून मार्क वूडला दडपणात टाकले, परंतु तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अंबाती १४ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ७ बाद २१७ धावा केल्या. रवी बिश्नोई व मार्क वूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 CSK vs LSG Live : MS DHONI HAS HIT MARK WOOD FOR BACK TO BACK SIXES, he becomes 7th player to cross the 5000-run mark in IPL, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.