IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : १४२६ दिवसं चेन्नई सुपर किंग्सचे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो आज उजाडला... ३ वर्ष, १० महिने, ३ आठवडे आणि ४ दिवसांनी CSK आणि महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेपॉकवर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमही खचाखच भरले आहे. पण, धोनीला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षकांना अखेरच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली आणि त्यांना सबुरीचे फळ मिळाले. MS Dhoni तीन चेंडू खेळला अन् त्यातही त्याने चेपॉकवर माहौल बनवला.. कॅप्टन कूल मैदानावर येताच चेपॉक धोनीच्या नावाने दणाणून निघाले. धोनीनेही सलग दोन षटकार खेचून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि मोठा विक्रम नोंदवला.
ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने Tiagoचा पत्रा चेपला, उलट TATAच ५ लाख रुपये देणार
महेंद्रसिंग धोनीने ३ चेंडूंत १२ धावा करताच आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारा तो सातवा व भारताचा पाचवा खेळाडू ठरला. विराट कोहली ६७०६ धावांसह या विक्रमात आघाडीवर आहे. त्यानंतर शिखर धवन ( ६२८४), डेव्हिड वॉर्नर ( ५९३७), रोहित शर्मा ( ५८८०), सुरेश रैना ( ५५२८), एबी डिव्हिलियर्स ( ५१६२) यांचा क्रमांक येतो. धोनीने २३६ सामन्यांत २०८ डावांत ५०००+ धावांचा टप्पा गाठला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"