IPL 2023, CSK vs LSG Live : यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ही पूर्णपणे महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) केंद्रीत झाली आहे... ४१ वर्षीय धोनीची ही शेवटची आयपीएल असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळेच धोनी चाहते मोठ्या संख्येने चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित राहिलेले दिसत आहेत. मग तो सामना मुंबईत, बंगळुरू, कोलकाता अगदी राजस्थानमध्ये असला तरी तेथे यजमान संघाचे कमी तर धोनी समर्थक अधिक दिसत आहेत. कॅप्टन कूल धोनीने २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तो फक्त आयपीएल खेळतोय.. २-३ वर्षांपासून त्याच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा होत्या आणि त्याने प्रत्येकवेळी त्यांना हेलिकॉप्टर शॉटने वावराबाहेर पाठवले. आजही तसेच काहीसे घडले...
२०१९महेंद्रसिंग धोनी - होपफुली, येस२०२०महेंद्रसिंग धोनी - डेफिनेटली, नॉट२०२१ महेंद्रसिंग धोनी - अजूनही क्रिकेट शिल्लक आहे२०२२महेंद्रसिंग धोनी - चेपॉकच्या चाहत्यांना गुडबाय नाही म्हटले तर त्यांच्यावर अन्याय होईल.
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स ( CSK vs LSG) यांच्यात सामना होतोय आणि धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या LSGचे नेतृत्व करतोय. चेन्नईच्या संघात आकाश सिंगच्या जागी आज दीपक चहरची एन्ट्री झाली आहे. चहर दुखापतीमुळे दोन-तीन आठवडे बाहेर होता. धोनीने आयपीएलमध्ये २४३ सामन्यांत ५०५२ धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने चार जेतेपदं जिंकली आहेत.
नाणेफेक झाल्यानंतर डॅनी मॉरिसन यांनी धोनीला एक प्रश्न विचारला... त्याने म्हटले... ही तुझी शेवटची आयपीएल आहे, तू कशी एन्जॉय करत आहेस... त्यावर धोनी म्हणाला, तुम्ही हे ठरवून टाकलंय की ही माझी शेवटची आयपीएल आहे ( त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते) धोनीच्या या विधानानंतर चाहते आनंदी झाले आणि मॉरिसननेही तुला पुढील वर्षीही खेळताना पाहायला आवडेल असे म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"