Join us  

IPL 2023 CSK vs LSG Live : चेपॉकवरही 'मराठी' आव्वाज...! ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉवने बरसले; MS Dhoni ने चोपून काढले

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा दमदार खेळ करून दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 9:18 PM

Open in App

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा दमदार खेळ करून दाखवला. चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली, परंतु ८ धावांच्या फरकाने दोघं माघारी परतल्याने CSKची धावगती थोडी मंदावली. लखनौ सुपर जायंट्सच्या रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) अप्रतिम गोलंदाजी करताना यजमानांना ३ धक्के दिले. शिवम दुबे व मोईन अली यांनी काही फटके मारले. १०.२ षटकांत CSKच्या ११८ धावा होत्या आणि पुढील ९.४ षटकांत LSG ने चांगले कमबॅक केले, असे वाटत असताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांनी गणित बिघडवले. 

ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने Tiagoचा पत्रा चेपला, उलट TATAच ५ लाख रुपये देणार लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनी येताच स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. कॉनवे व गायकवाड यांनी घरच्या मैदानावर आक्रमक सुरूवात केली. कॉनवेने दुसऱ्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारले. ऋतुराजनेही LSGचा यशस्वी गोलंदाज मार्क वूडला खणखणीत षटकार खेचले आणि त्या षटकात दोघांनी मिळून १९ धावा चोपल्या. आयपीएलमध्ये ३८ इनिंग्जनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत ऋतुराजने पाचवे स्थान पटकावले. या विक्रमात ख्रिस गेल १५८६ धावांसह अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ शॉन मार्श ( १५५७), मायकेल हसी ( १४४३), सचिन तेंडुलकर ( १३७१) व ऋतुराज ( १३५६) असा क्रमांक येतो. ऋतुराज व कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. 

रवी बिश्नोईने CSKला पहिला धक्का दिला. ऋतुराज ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. मार्क वूडने अवघड झेल सहजतेने टिपला. ८ धावांनंतर कॉनवेही कृणाल पांड्याच्या अफलातून झेलमुळे माघारी परतला. कॉनवेने २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांवर माघारी परतला. दोन्ही सलामीवीर माघारी परल्याने CSKच्या धावांचा वेग मंदावलेला दिसला अन् LSG चे गोलंदाज पकड घेऊ पाहत होते. शिवम दुबे व मोईन अली सुरूवातीला संयमाने खेळले. पण, नंतर दुबेने हात मोकळे करायला सुरूवात केली आणि त्याने बिश्नोईला सलग दोन षटकार खेचले. मात्र, १६ चेंडूंत २७ धावा करणार्या दुबेला त्याच षटकात बिश्नोईने गुगलीवर झेलबाद केले. त्यानंतर मोईन अलीने हात सैल केले अन् आवेश खानला सलग तीन चौकार लगावले. 

बिश्नोईने पुन्हा एकदा गुगलीवर मोईन अलीला ( १९) फसवले अन् स्टम्पिंग होऊन त्याला माघारी परतावे लागले. महेंद्रसिंग धोनी मैदानावर येईल असे वाटत असताना अंबाती रायुडू आला. त्याने तिसरा चेंडूवर चौकार खेचला. बिश्नोईने ४ षटकांत २८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. बेन स्कोक्स ८ धावांवर माघारी परतला. रायुडू कॅरेबियन फटके मारताना दिसला अन् त्यामुळे CSKच्या धावगतीला पुन्हा वेग मिळाला. रवींद्र जडेजा १ धावेवर माघारी परतला अन् MS Dhoni मैदानावर आला. चेपॉकवर प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. धोनीनेही सलग दोन षटकार खेचून मार्क वूडला दडपणात टाकले, परंतु तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अंबाती १४ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ७ बाद २१७ धावा केल्या. वूडने तीन विकेट्स घेतल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडलखनौ सुपर जायंट्स
Open in App