IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२३ च्या सामन्याची सुरुवात एका विचित्र कारणामुळे उशीराने झाली. चेन्नईचे फलंदाज आणि लखनौचे क्षेत्ररक्षक मैदानात खेळायला येताच एक श्वान मैदानात शिरला. अशा स्थितीत सामना सुरू होऊ शकला नाही. ग्राऊंड स्टाफने श्वानाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांना खूप नाचवले. त्यामुळे सामना सुरू होण्यास पाच मिनिटांचा विलंब झाला. श्वानाने मैदानात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांनी खूप मजा घेतली, मात्र एमए चिदंबरम स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर समालोचन करताना सुनील गावस्कर चांगलेच संतापले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली.
चेपॉकवर येताच इमोशनल झाला Suresh Raina, ऋतुराजला मारली कडकडून मिठी अन् म्हणाला...
गावसकर म्हणाले की, ''अशा प्रकारे सामना सुरू होण्यास उशीर करणे योग्य नाही. सुरक्षेची जबाबदारी ज्याच्यावर असेल त्यांनी याची काळजी घ्यायला हवी होती. ते चांगले नाही.'' श्वानाला पकडण्यासाठी चार-पाच ग्राऊंड स्टाफ आले, मात्र त्यांना येताना पाहून त्याने मैदानाच्या पलीकडे धाव घेतली. हे पाहून अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्ड यांनाही हसू आवरता आले नाही. त्याचवेळी डगआऊटमध्ये बसलेले चेन्नईचे खेळाडूही हसताना दिसले. यामध्ये रवींद्र जडेजा, दीपक चहर, मोईन अली यांचा समावेश होता. नंतर कॅप्टन एमएस धोनीही कॅमेऱ्याच्या नजरेत आला आणि श्वान मैदानात शिरल्याची माहिती मिळताच तोही हसायला लागला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 CSK vs LSG Live : The Dog entered in the stadium and slight delay play start, Sunil Gavaskar get angry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.