IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्सच्या २१७ धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक सुरुवात केली. कायले मायर्स व लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ५.३ षटकांत ७९ धावा कुटल्या. पण, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने क्षेत्ररक्षणात व गोलंदाजीत बदल केले अन् १२ चेंडूंत ३ विकेट्स मिळवून LSG ला बॅकफूटवर फेकले.
तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video
डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋतुराजने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. कॉनवेने २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ४७ धावा केल्या. शिवम दुबेने २७ धावा आणि मोईन अली १९ धावा करून बाद झाले. बेन स्टोक्स व रवींद्र जडेजा अपयशी ठरले. MS Dhoni मैदानावर येताच चेपॉकवर प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. धोनीनेही सलग दोन षटकार खेचून त्यांना दाद दिली. त्याने ३ चेंडूंत १२ धावा करून आयपीएलमध्ये ५०००+ धावांचा टप्पा ओलांडला. अंबाती रायुडू १४ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ७ बाद २१७ धावा केल्या. रवी बिश्नोई व मार्क वूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
फॉर्मात असलेल्या कायले मायर्सने खणखणीत फटके मारले.. चेंडू अन् बॅटचा संपर्क होताना कानाला तृप्त करणारा आवाज येत होता. लोकेश राहुल एका बाजून संयमी खेळ करून त्याला साथ देताना दिसला. मायर्सची धास्ती घेतलेल्या तुषार देषपांडेने चौथ्या षटकात ०, 1nb, 1w, 1nb, 1w, ४, 1w, ६, ० अशा धावा दिल्या. मायर्सने २१ चेंडूंत आयपीएल २०२३ मधील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. सहाव्या षटकात मोईन अलीने CSK समोरील मोठा अडथळा दूर केला. मायर्स २२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. केएलसह त्याची ७९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मिचेल सँटनरने पुढच्याच षटकात दीपक हुडाला ( २) बेन स्टोक्सकरवी झेलबाद केले. अलीने त्याच्या पुढच्या षटकात लोकेश राहुलला ( २०) ऋतुराजच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. LSG ने १२ चेंडूंत ३ विकेट्स घेत सामना फिरवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"