IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

IPL 2023 CSK vs LSG: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 08:16 AM2023-04-04T08:16:55+5:302023-04-04T08:25:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 CSK vs LSG: We need to improve our pace bowling a bit, said Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni | IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

IPL 2023 CSK vs LSG: '...अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल'; MS धोनी भडकला, दुसरी वॉर्निग दिली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई: घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपरकिंग्जने यंदाच्या आयपीएलमध्ये आपले गुणांचे खाते उघडताना लखनऊ सुपरजायंट्स संघाला १२ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ७ बाद ११७ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी लखनऊला २० षटकांत ७ बाद २०५ धावांवर रोखले. मोईन अलीने ४ बळी घेत चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. यासह चेन्नईने गुणांचे खातेही उघडले.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर सामन्यादरम्यान सीएसकेने वाइड आणि नो बॉलसह अनेक अतिरिक्त धावा दिल्या. धोनीला हे अजिबात आवडले नसल्याचं धोनी याने सामना संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आम्हाला थोडी वेगवान गोलंदाजी सुधारण्याची गरज आहे. परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक आहे, असं धोनीने सांगितले. विरोधी गोलंदाज काय करत आहेत याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना नो-बॉल किंवा अतिरिक्त वाइड टाकावे लागणार नाहीत. अन्यथा त्यांना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरी वॉर्निंग असेल नाहीतर मग मी निघून जाईन, असं धोनी यावेळी म्हणाला. 

भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार लोकेश राहुल आणि काइल मायर्स यांनी लखनऊला वेगवान सुरुवात करून देताना ३५ चेंडूंतच ७९ धावांची सलामी दिली. यामध्ये मायर्सने केलेला हल्ला मोलाचा ठरला. परंतु, मोईनने लखनऊच्या फलंदाजीला खिंडार पाडत मायर्स, राहुल, कृणाल पांड्या आणि मार्कस स्टोइनिस यांना बाद केले. निकोलस पूरनने आक्रमक फटकेबाजीसह लखनऊच्या आशा कायम राखल्या होत्या. १६व्या षटकात तो झेलबाद झाल्यानंतर चेन्नईने मिळवलेली पकड सोडली नाही.

तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड आणि डीवोन कॉन्वे यांच्या जोरावर चेन्नईने द्विशतकी मजल मारली. दोघांनी केवळ ८ षटकांमध्ये संघाचे शतक झळकावले आणि ५६ चेंडूंत ११० धावांची जबरदस्त सलामी दिली. रवी बिश्नोईने दहाव्या षटकात त्याला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात कॉन्वे मार्क वुडच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोइन अली आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३२ धावांची वेगवान भागीदारी केली. बिश्नोईने ३ बळी घेतले.

Web Title: IPL 2023 CSK vs LSG: We need to improve our pace bowling a bit, said Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.