IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : रोहित शर्मावर ( Rohit Sharma) दडपण निर्माण करण्यात महेंद्रसिंग धोनीला यश मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 04:10 PM2023-05-06T16:10:14+5:302023-05-06T16:19:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs MI Live Marathi : MS Dhoni comes up to the stumps & a wicket for deepak Chahar, Rohit Sharma registered unwanted record, Video  | IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : रोहित शर्मावर ( Rohit Sharma) दडपण निर्माण करण्यात महेंद्रसिंग धोनीला यश मिळाले. दीपक चहरच्या गोलंदाजीवर MS Dhoni किपिंगला यष्टिंच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याने कॅचिंग पोझिशनला तीन खेळाडू उभे केले होते. रोहितही गांगरला अन् स्कूप मारायला गेला, अन्  रवींद्र जडेजाने सोपा झेल घेतला. धोनीचा हा डाव यशस्वी ठरला. 

फॉर्मात असलेला तिकल वर्मा आजारी पडल्यामुळे मुंबई इंडियन्सवर दडपण निर्माण झाले होते आणि त्याचे परिणाम खेळावरही दिसले. कॅमेरून ग्रीन व इशान किशन ही जोडी आज सलामीला आली खरी, परंतु CSKच्या गोलंदाजांनी त्यांना गुंडाळले. रोहित ६२ इनिंग्जनंतर सलामीला खेळला नाही. कॅमेरून ग्रीनला ( ६) प्रमोशन देऊन फायदा झाला नाही. तुषार देशपांडेने दुसऱ्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. 

दीपक चहरच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात इशान किशनही ( ७) बाद झाला आणि १३ धावांत मुंबईचे दोन्ही सलामीवीर परतले.  स्ट्राईकवर रोहित शर्मावर दडपण निर्माण करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी हेल्मेट घालून यष्टिंच्या जवळ येऊन किपिंगला आला अन् यश मिळाले. रोहितने नको तो फटका मारला अन् त्याला भोपळ्यावर माघारी जावं लागलं. आयपीएलमध्ये रोहित सर्वाधिक १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने दिनेश कार्तिक ( १५), सुनील नरीन ( १५), मनदीप सिंग ( १५) व अंबाती रायुडू ( १४) यांना मागे टाकले.  कर्णधार म्हणून रोहित ११वेळा शून्यावर बाद झाला अन् त्याने गौतम गंभीरच्या नावावर असलेला ( १०) नकोसा विक्रम स्वतःच्या नावे केला.  


नेहार वढेरा व सूर्यकुमार यादव यांनी MI चा डाव सावरला असून ३ बाद १४ वरून ते संघाला ७ षटकांत ४४ धावांवर घेऊन गेले आहेत. 

Web Title: IPL 2023, CSK vs MI Live Marathi : MS Dhoni comes up to the stumps & a wicket for deepak Chahar, Rohit Sharma registered unwanted record, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.