IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी खिळखिळी करून टाकली. कॅमेरून ग्रीन, इशान किशन व रोहित शर्मा हे फलंदाज अवघ्या १४ धावांत माघारी परतले.. सामन्यावर CSKची मजबूत झालेली पकड २२ वर्षीय फलंदाज नेहाल वढेरा ( Nehal Wadhera) सैल केली आणि MI ला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने अर्धशतक झळकावताना CSKसमोर तगडे लक्ष्य उभे केले.
MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video
मुंबई इंडियन्सने आज फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला, परंतु तो अपयशी ठरला. कॅमेरून ग्रीन ( ६) व इशान किशन (७) ही जोडी आज सलामीला आली खरी, परंतु CSKच्या गोलंदाजांनी त्यांना गुंडाळले. कॅमेरूनचा त्रिफळा तुषार देशपांडेने उडवला. दीपक चहरच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात इशान झेलबाद झाला. स्ट्राईकवर रोहित शर्मावर दडपण निर्माण करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी हेल्मेट घालून यष्टिंच्या जवळ येऊन किपिंगला आला. रोहितने स्कूप मारला भोपळ्यावर माघारी परतला.
नेहाल वढेरा व सूर्यकुमार यादव यांनी MI चा डाव सावरला असून ३ बाद १४ वरून ते संघाला ४ बाद ६९ धावांवर घेऊन गेले आहेत. या दोघांची ५५ धावांची भागीदारी रवींद्र जडेजाने तोडली. सूर्यकुमार २६ धावांवर त्रिफळाचीत झाला. वढेरा चांगला खेळ करताना दिसला, त्याने महीश तिक्षणाला मारलेला खणखणीत षटकार पाहून संघ मालकीण नीता अंबानीही आनंदी झाल्या. वढेराने ४६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १८व्या षटकात महिषा पथिराणाने MIला धक्का दिला. वढेरा ५१ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर त्रिफळाचीत झाला. ( पाहा त्याची विकेट)
तुषार देशपांडेने MIच्या टीम डेव्हिडला ( २) झेलबाद केले, पुढच्याच चेंडूवर अर्शद खानचा झेल शिवम दुबेकडून सुटला. बोटाला मार लागल्याने तो मैदानाबाहेर गेला. पण, पुढच्याच षटकात पथिराणाने अर्शदची विकेट मिळवून दिली. स्तब्स 20 धावांवर झेलबाद झाला, रवींद्र जडेजाने सुरेख झेल टिपला. पथिराणाने 16 धावांत 3 विकेट्स घेतल्या. मुंबईला 8 बाद 139 धावा करता आल्या. तुषारने 26 धावांत दोन विकेट्स घेतल्या.