IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील सामना चिदंबरम स्टेडियमवर होतोय. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारचा सामना असल्याने फलंदाजांना सुरुवातीला मदत मिळेल, यासाठी माहीने हा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आठ सामन्यांत पाच सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यांत संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाबचा संघ ८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे या फॉर्मात असलेल्या जोडीने PBKS च्या जलदगती गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये सेट होऊ दिले नाही. त्यामुळे गब्बर धवनने फिरकी गोलंदाजांना आणून CSKची धावगती रोखण्याचा प्रयत्न केला. ऋतुराज व डेव्हॉन यांनी ६ षटकांत ५७ धावा फलकावर चढवल्या. डेव्हिड कॉनवेने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आणि जगात सर्वात कमी इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांत त्याने शॉन मार्शसोबत ( १४४ इनिंग्ज) बरोबरी केली. या विक्रमात ख्रिस गेल ( १३२) व लोकेश राहुल ( १४३) आघाडीवर आहेत. त्याने बाबर आजम ( १४५) व आरोन फिंच ( १५९) यांचा विक्रम मोडला.
दहाव्या षटकात सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज यष्टिचीत झाला. त्याने ३१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३७ धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी डेव्हॉनसह ८६ धावा जोडल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"