Join us  

IPL 2023, CSK vs PBKS Live : ६,६! महेंद्रसिंग धोनीने २ चेंडूंत माहोल बनवला, किरॉन पोलार्डनंतर 'माही'चा जगात जलवा

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा चेन्नईचे चिदंबरम स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 6:24 PM

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा चेन्नईचे चिदंबरम स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीची ही अखेरची आयपीएल असल्याने चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित राहतोय... धोनीही चाहत्यांना निराश करताना दिसत नाही. आजही जेव्हा रवींद्र जडेजा बाद होऊन पेव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा CSK फॅन्स प्रचंड आनंद दिसले. कारण, धोनी फलंदाजीला आला होता आणि स्टेडियम धोनीच्या नावाने दणाणून निघाले. धोनीनेही २०व्या षटकाची अखेरची दोन चेंडू उत्तुंग भिरकावली अन् मोठ्या विक्रमाची नोंद केली.

१७ चेंडूंत ७० धावा! डेव्हॉन कॉनवेची नाबाद ९२ धावांची खेळी; धोनीने सलग २ Six मारून संपवली मॅच ऋतुराज गायकवाड ( ३७) व डेव्हॉन कॉनवे यांनी पुन्हा CSKला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. PBKS च्या गोलंदाजांची चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली धुलाई केली. पंजाबच्या गोलंदाजांची फौज पाहून धोनीने डावखुऱ्या फलंदाजांना मैदानावर पाठवले अन् त्यांनी धोनीचा निर्णय योग्य ठरवला. फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणे आज डग आऊटमध्ये बसून राहिला. शिवम दुबेने ( २८) डेव्हॉनसह २६ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. १८ व १९व्या षटकात पंजाबच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला अन् डेव्हॉनला शतकापासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. डेव्हॉनने ५२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या. 

महेंद्रसिंग धोनीने आज ४ चेंडूंत १३ धावा चोपल्या. त्याने सॅम करनच्या अखेरच्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार खेचले. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या षटकात १००० धावांचा टप्पा आज गाठला आणि  किरॉन पोलार्डनंतर ( ११८२ धावा, १६२ इनिंग्ज) तो दुसरा फलंदाजा ठरला. डेव्हिड मिरलने ७३८ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही धोनीने २०व्या षटकात २९० चेंडूंत ७०९ धावा चोपल्या आहेत आणि त्यात ५९ षटकार व ४९ चौकार खेचले आहेत.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीपंजाब किंग्स
Open in App