IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सवर चेपॉकवर पंजाब किंग्सने थरारक विजयाची नोंद केली. २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या PBKSला फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीचा फायदा मिळेल हे नक्की होतं. तरीही रवींद्र जडेजाने मोक्याच्या विकेट घेताना PBKS वर दडपण ठेवले होते, तुषार देशपांडेने महत्त्वाच्या विकेट घेतल्या, परंतु त्याने ४ षटकांत ४९ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. मथिशा पथिराणाने २०व्या षटकात CSKच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न केले, परंतु सिकंदर रझाने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकून दिली. पण, या सामन्यात आयपीएल इतिहासातील अविश्वसनीय झेल पाहायला मिळाला.
शेवटच्या चेंडूवर पंजाब किंग्स जिंकले, MS Dhoni च्या बालेकिल्ल्यात १५ वर्षांनंतर CSK हरले
ऋतुराज गायकवाड ( ३७) व डेव्हॉन कॉनवे यांनी पुन्हा CSKला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणे आज डग आऊटमध्ये बसून राहिला. धोनीने डावखुऱ्या फलंदाजांना प्रमोशन दिले. शिवम दुबेने ( २८) डेव्हॉनसह २६ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. डेव्हॉनने ५२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या. धोनीने ४ चेंडूंत १३ धावा चोपल्या. त्याने सॅम करनच्या अखेरच्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार खेचले आणि चेन्नईला ४ बाद २०० धावा करून दिल्या.
शिखर धवन ( २८) आणि प्रभसिमरन सिंग यांनी PBKS ला अर्धशतकी सलामी दिली. अथर्व तायडे ( १३) आज अपयशी ठरला. त्याला आणि प्रभसिमरन सिंगला ( ४२) रवींद्र जडेजाने बाद केले. सॅम करन (२९) व लिएम लिव्हिंगस्टोन मैदानावर असल्याने CSKचे टेंशन कायम ठेवले. लिव्हिंगस्टोन २४ चेंडूंत ४० धावा करून माघारी परतला. जितेश शर्माने १० चेंडूंत २१ धावा केल्या आणि त्याचाच झेल अफलातून पद्धतीने टिपला गेला. सिकंदर रझाने १३ धावा करून पंजबाला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा २००+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारा पंजाब हा पहिला संघ ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"