IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सला २०० धावा करूनही आज घरच्या मैदानावर विजयासाठी घाम गाळावा लागला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर पंजाब किंग्सने तोडीसतोड उत्तर दिले. लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम करन यांनी CSKच्या गोलंदाजांना चोपले होते. जितेश शर्माने अफलातून फटकेबाजी करून महेंद्रसिंग धोनीचं टेंशन वाढवलेलं. तुषार देशपांडेने लिव्हिंगस्टोन व जितेश जरी बाद केले असले तरी त्याने अखेरच्या षटकांत भरपूर धावा दिल्या अन् त्या CSKला महागात पडल्या.
शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी PBKS ला अर्धशतकी सलामी दिली. तुषार देशपांडेने पहिला धक्का देताना धवनला ( २८) माघारी पाठवले. प्रभसिमरन चांगली फटकेबाजी करत होता. अथर्व तायडेने मागील सामन्यातील कामगिरीमुळे अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. स्वतःच्याच गोलंदाजीवर रवींद्रने PBKSच्या अथर्वचा (१३) झेल घेतला. तत्पूर्वी, रवींद्रने ९व्या षटकात प्रभसिमरनला ( ४२) यष्टिचीत केले. धोनीने चपळाईने ही स्टम्पिंग केली. सॅम करनने दोन उत्तुंग फटके खेचले, परंतु झेल टिपण्यासाठी CSKचा खेळाडूच तिथे नव्हता. अजिंक्य रहाणेने डाईव्ह मारून एक झेल घेण्याचा प्रयत्न केला.
सॅम करन व लिएम लिव्हिंगस्टोन मैदानावर असल्याने CSKचे टेंशन कायम होते. पंजाबच्या या फलंदाजांना सुरुवातीला मोठे फटके खेचताना अडचण येताना दिसली, परंतु १६व्या षटकापासून त्यांनी हात मोकळे करण्यास सुरुवात केली. ३० चेंडूंत ७२ धावा हव्या असताना लिव्हिंग्स्टोने ६,६,४lb,६ अशी फटकेबाजी केली. पण, धोनीने तुषार देशपांडेला सल्ला दिला अन् त्याने आखुड चेंडूवर लिव्हिंगस्टोनला झेल देण्यास भाग पाडले. लिव्हिंगस्टोन २४ चेंडूंत ४० धावा करून माघारी परतला. २४ चेंडू ४८ धावा असा सामना अजूनही पंजाबच्या पारड्यात होता. करन व जितेश शर्मा यांनी रवींद्रच्या षटकात चांगलेच हात मोकळे केले.
१८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मथीशा पथिराणाने २९ धावा चोपणाऱ्या करनचा दांडा उडवला. जितेश असल्याने अजूनही CSKचे टेंशन कायम होतेच... पथिराणाने १८व्या षटकात ९ धावा देऊन १ विकेट घेतली. १२ चेंडूंत २२ धावा PBKSला करायच्या होत्या. तुषारचा पहिलाच चेंडू जितेशने चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर जितेशने उत्तुंग फटका मारला अन् बदली खेळाडू एसके राशीदने तो टिपला, परंतु त्याचा तोल सीमारेषेजवळ गेला. पाय सीमारेषेला लागणार तितक्यात राशीदने तो मागे घेतला अन् आयपीएल २०२३ मधील हा अविश्वसनीय झेल ठरला. जितेश २१ धावांवर बाद झाला. ६ चेंडू ९ धावा पंजाबला करायच्या होत्या अन् अखेरचं षटक पथिराणा टाकणार होता. पथिराणाने पहिल्या ५ चेंडूंत ६ धावा दिल्या आणि १ चेंडूंत ३ धावा पंजाबला हव्या होत्या. सिंकदरने ३ धावा घेताना थरारक विजय मिळवला. पंजाबने ४ विकेट्सने ही मॅच जिंकली. 2008 नंतर चेपॉकवर चेन्नईचा संघ २०० धावा करूनही प्रथमच हरला.
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ( ३७) व डेव्हॉन कॉनवे यांनी पुन्हा CSKला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणे आज डग आऊटमध्ये बसून राहिला. धोनीने डावखुऱ्या फलंदाजांना प्रमोशन दिले. शिवम दुबेने ( २८) डेव्हॉनसह २६ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. डेव्हॉनने ५२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या. धोनीने ४ चेंडूंत १३ धावा चोपल्या. त्याने सॅम करनच्या अखेरच्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार खेचले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs PBKS Live Marathi : PUNJAB KINGS win off the final ball! Punjab Kings records the first successful 200-plus chase at Chepauk by a visiting team since 2008
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.