IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या मैदानावर बेक्कार धुलाई केली. ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतल्यानंतर RCBचे खेळाडू जल्लोष करू लागले, परंतु आधी अजिंक्यने त्यांच्या जल्लोषावर पाणी फिरवले. त्यानंतर कॉवने व दुबे यांनी RCB ला रडकुंडीला आणले.
RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यावर दडपण बनवण्यात RCBच्या गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडू ऋतुराज ( ३) झेलबाद झाला. अजिंक्य रहाणेने दमदार फटकेबाजी केली. अजिंक्य व कॉनवे यांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.अजिंक्य व कॉनवे यांची ४३ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी वनिंदू हसरंगाने संपुष्टात आणली. अजिंक्य २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. कॉनवेने ३२ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. कॉनवेची फटकेबाजी सुरूच असताना शिवम दुबेच्याही १००+ मीटर षटकारांनी स्टेडियम दणाणून सोडले.
दुबेने हर्षल पटेलच्या चेंडूंत १११ मीटर लांब षटकार खेचला अन् यंदाच्या आयपीएलमधील हा दुसरा उत्तुंग षटकार ठरला. फॅफने LSGविरुद्ध ११५ मीटर षटकार खेचला आहे. दुबे व कॉनवे यांनीही २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांची ३७ चेंडूंवरील ८० धावांची भागीदारी हर्षलने तोडली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. चेन्नईला १७० धावांवर तिसरा धक्का बसला.
" width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen">
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"