IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे शेवटचं चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र खेळताना दिसणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार Ms Dhoni याची ही शेवटची IPL स्पर्धा असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सामना सुरू होण्याच्या जवळपास ३-४ तास आधीच प्रेक्षकांची स्टेडियमबाहेर भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. पण, या सामन्याआधी CSKला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. बेन स्टोक्स, दीपक चहर या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाहीत, त्यात धोनीच्याही गुडघ्याला दुखापत झाल्याचे मागील सामन्यात दिसले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात रवींद्र जडेजा CSK चे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.
महेंद्रसिंग धोनी जरी प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी तो इम्पॅक्ट प्लेअरमध्ये दिसू शकतो... काल कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरला होता. अशात धोनीही आज तिच आयडीया वापरू शकतो. धोनीच्या अनुपस्थितीत अंबाती रायुडू किंवा डेव्हॉन कॉनवे यष्टिंमागे दिसेल. पण, चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव सत्रात धोनी तंदुरुस्त असल्याचे दिसले, परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याची शक्यता फारच कमी आहे.
बेन स्टोक्ससह सिसांडा मगाला यालाही दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. मलागाच्या जागी ड्वेन प्रेटोरियस किंवा महिषा पथिर्ना यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन प्रेटोरियस, महिश तिक्षणा, तुषार देशपांडे, आकाश सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"