IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज चिन्नास्वामी स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या प्रेक्षकांमसमोर बेक्कार धुलाई केली. RCBच्या विराट कोहलीच्या चेहऱ्यात संपात प्रकर्षाने जाणवत होता. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसही निराश दिसला. दुबेची विकेट मिळताच कोहलीने आक्रमक जल्लोष केला अन् त्याच्या तोंडून शिवी आल्याचे दिसले.
RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यावर दडपण बनवण्यात RCBच्या गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने ऋतुराजला ( ३) झेलबाद केला. अजिंक्यने दमदार फटकेबाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी कॉनवेसह ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने ही भागीदारी संपुष्टात आणली. अजिंक्य २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. कॉनवेची फटकेबाजी सुरूच असताना शिवम दुबेच्याही १००+ मीटर षटकारांनी स्टेडियम दणाणून सोडले.
दुबेने हर्षल पटेलच्या चेंडूंत १११ मीटर लांब षटकार खेचला अन् यंदाच्या आयपीएलमधील हा दुसरा उत्तुंग षटकार ठरला. फॅफने LSGविरुद्ध ११५ मीटर षटकार खेचला आहे. दुबे व कॉनवे यांनीही २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांची ३७ चेंडूंवरील ८० धावांची भागीदारी हर्षलने तोडली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. चेन्नईला १७० धावांवर तिसरा धक्का बसला. दुबे काही ऐकत नव्हता आणि त्याने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण, पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. दुबेने २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावा कुटल्या. मोईन अली व अंबाती रायुडूनेही चांगले फटके मारले, परंतु रायुडू मोठी खेळी करू शकला नाही.
हर्षलने २०व्या षटकात दोन फुलटॉस चेंडू ( No Ball) टाकल्याने त्याला षटक तिथेच सोडावे लागले. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल ४ चेंडू टाकण्यासाठी आला. अखेरच्या दोन चेंडूंसाठी MS Dhoni फलंदाजीला आला अन् स्टेडियम दणाणून गेले. CSK ने ६ बाद २२६ धावांचा डोंगर उभा केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : Devon Conway ( 83), Ajinkya Rahane ( 37) & Shivam Dube ( 54) calssi innings, CSK post 225/6 against RCB at Chinnaswamy Stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.