IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni करतो 'अनहोनी को होनी'! ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिसच्या १३८ धावा व्यर्थ; CSKचा थरारक विजय

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था २ बाद १५ अशी झाली होती. पण, ग्लेन मॅक्सवेल व फॅफ ड्यू प्लेसिसने १२६ धावांची भागीदारी करून मॅच आणली होती अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:13 PM2023-04-17T23:13:52+5:302023-04-17T23:16:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : excellent catch by MS Dhoni stops the BIG SHOW Faf Du plessis & Glenn Maxwell, CSK have defeated RCB by 8 runs. | IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni करतो 'अनहोनी को होनी'! ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिसच्या १३८ धावा व्यर्थ; CSKचा थरारक विजय

IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni करतो 'अनहोनी को होनी'! ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिसच्या १३८ धावा व्यर्थ; CSKचा थरारक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : विजयासाठी २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था २ बाद १५ अशी झाली होती. आता हातातून मॅच गेली असे RCBच्या समर्थकांना वाटले, परंतु कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांचे वादळ घोंगावले. या दोघांनी ६१ चेंडूंत १२६ धावांची  भागीदारी करून चेन्नई सुपर किंग्सच्या हातून मॅच खेचून आणली होती. पण, ज्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे तिथे काहीही घडू शकते. मॅक्सवेल व फॅफ मागोमाग माघारी परतले अन् CSKने हातातून निसटलेली ही मॅच खेचून आणली. CSKच्या खेळाडूंनी जिथे ४ सोपे झेल टाकले, तिथे महेंद्रसिंग धोनीने RCBच्या दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंचे अफलातून झेल टिपून 'अनहोनी को होनी' करून दाखवली. 


इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या आकाश सिंगने पहिल्याच षटकात विराट कोहलीची ( ६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर तुषार देशपांडेने महिपाल लोम्रोरला ( ०) माघारी पाठवले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी CSKच्या गोलंदाजांनी चांगली धुलाई केली. मॅक्सवेल ३६ चेंडूंत ३ चौकार व ११ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल व फॅफची ६१ चेंडूंतील १२६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मोईन अलीला धोनीने गोलंदाजीवर आणले अन् त्याने पहिल्याच षटकात यश मिळवून दिले. मॅक्सवेलसारखाच फॅफ बाद झाला. फॅफड्या कमरेत उसण भरली होती आणि तो बँडेज बांधून खेळत होता. तो थोडा थकलेलाच दिसला अन् अलीच्या चेंडूवर मारलेला त्याचा फटका फसला. फॅफ ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर धोनीच्या हाती झेलबाद झाला.  


 " width="600" height="500" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen">

दिनेश कार्तिकला आज फिनिशरची भूमिका पार पाडण्याची संधी मिळाली आणि त्याने सुरुवातीला काही चांगले फटकेही मारले. २४ चेंडूंत ४६ धावा RCB ला हव्या होत्या. २२ धावांवर असताना ऋतुराजच्या हातून कार्तिकचा सोपा झेल सुटला. आज CSK कडून बरेच झेल सुटले आणि तेच महागात पडताना दिसले. पण, २८ धावांवर कार्तिक झेलबाद झाला आणि १९ चेंडू ३६ धावा असे समीकरण समोर होते. १७व्या षटकात पथिरानाने RCBला धक्का देताना शाहबाज अहमदला ( १२) बाद केले आणि यावेळी ऋतुराजने झेल टिपला. वेन पार्नेलही ( २) देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला. ६ चेंडूंत १९ धावा RCBला करायच्या होत्या. ज्युनियर मलिंगा 'पथिराना' अखेरचं षटक टाकायला आला आणि त्याने यजमानांना ८ बाद २१८ धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले. चेन्नईने ८ धावांनी ही मॅच जिंकली. 

 

तत्पूर्वी, ऋतुराजला ( ३) स्वस्तात माघारी परतल्यानंतर RCB चे खेळाडू आनंदात होते, परंतु अजिंक्यने त्यांना रडकुंडीला आणले. त्याने कॉनवेसह ४३ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी करताना २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि कॉनवे यांनी ३७ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे ४५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. दुबे २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.  

Web Title: IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : excellent catch by MS Dhoni stops the BIG SHOW Faf Du plessis & Glenn Maxwell, CSK have defeated RCB by 8 runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.